SAKAL Impact: शहरातील पार्किंग समस्येवर ठोस कारवाई करा! महापालिका आयुक्तांकडून कानउघाडणी; ‘सकाळ’च्या वृत्ताची गांभीर्याने दखल

Latest Nashik News : ऐन सणासुदीच्या काळात वाहनचालकांना शहरात पार्किंगसाठी जागा नसल्याने वादावादीचे प्रसंग उद्‌भवतात. यासंदर्भात ‘दै.सकाळ’मधून शहरातील पार्किंगच्या विषय ठळकपणे मांडण्यात आला.
Dr. Ashok Karanjkar
Dr. Ashok Karanjkaresakal
Updated on

नाशिक : शहरातील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढते आहे. ऐन सणासुदीच्या काळात वाहनचालकांना शहरात पार्किंगसाठी जागा नसल्याने वादावादीचे प्रसंग उद्‌भवतात. यासंदर्भात ‘दै.सकाळ’मधून शहरातील पार्किंगच्या विषय ठळकपणे मांडण्यात आला.

या वृत्ताची महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी गांभीर्याने दखल घेत, संबंधित विभागांना यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. तसेच, चौका-चौकात रिक्षांमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रिक्षा थांबे निश्चित करण्यासंदर्भातही सूचना केल्या आहेत. (sakal impact Take concrete action on parking problem in city)

महापालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी मंगळवारी (ता. १५) घेतलेल्या बैठकीमध्ये शहरातील पार्किंग आणि रिक्षा थांबे यासंदर्भात संबंधित विभागांना ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासंदर्भात शहर वाहतूक पोलीस शाखेशी समन्वय साधून पार्किंग, वाहतूक कोंडी, रिक्षा थांबे ठोस कारवाई करण्याच्या यापूर्वीही सूचना केल्या मात्र त्यावर ठोस अंमलबजावणी होत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग आणि मिळकत विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. तसेच, नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या या समस्या सोडविण्यासाठी शहर वाहतूक पोलीस शाखेशी समन्वय साधून ठोस कारवाई करण्याचे आदेशच दिले आहेत.

शहराची वाढती लोकसंख्या आणि काळाची गरज असल्याने वाहनांचीही संख्या वाढते आहे. परंतु त्या तुलनेत शहरात पार्किंगची सुविधा नाहीत. परिणामी शहरासह उपनगरांमध्ये पार्किंगची समस्या दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणात भेडसावते आहे. याच संदर्भात सोमवारी (ता १४) ‘दै. सकाळ’मधून ‘वाहने बेसुमार अन्‌ पार्किंगची मारामार’ या ठळक मथळ्याखाली वृत्त प्रसिद्‌ध झाले होते. (latest marathi news)

Dr. Ashok Karanjkar
Latest Maharashtra News Updates : ISSF विश्वचषक फायनल २०२४ च्या पहिल्या दिवशी सोनम उत्तम मस्करने रौप्यपदक जिंकले

या वृत्तांतून महापालिका प्रशासनाकडून वाहनचालकांसाठी पार्किंगची सुविधाच नाहीत. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत येणाऱ्या वाहनचालकांना नो-पार्किंग वा जिथे जागा मिळेल तिथे वाहने पार्क करावी लागतात. यातून वाहतूक पोलीस आणि वाहन चालकांमध्ये वादावादी होते. पोलीस पार्किंग उपलब्‌ध करून देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांची अंगुलीनिर्देश महापालिका प्रशासनाकडे असते, तर महापालिकेकडे शहरात पार्किंगसाठी जागा नाही.

वाहतूक शाखेकडून नियोजन

दरम्यान, शहर वाहतूक शाखेकडूनही शहरातील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी फेरनियोजन केले जाणार आहे. त्यासाठी लवकरच महापालिका प्रशासन आणि शहर वाहतूक शाखा यांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये शहराच्या मध्यवर्ती भागात पे ॲण्ड पार्किंगसाठी जागा आणि सम-विषम तारखांनिहाय पार्किंगसह अन्य काही उपाययोजना करण्यासंदर्भातील पर्यायांवर विचारविनिमय होण्याची शक्यता आहे.

Dr. Ashok Karanjkar
Nashik Police Transfer : आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.