SAKAL Shree Family Guide : पादुकांच्या साक्षीने नववर्षाचा आरंभ! ॲड. एकनाथ- प्रा. नंदिनी पगार कुटुंबीयांकडून पादुकांचे जल्लोषात स्वागत

Shree Family Guide : ‘श्री फॅमिली गाईड’ प्रोग्रॅमची संकल्पना ‘एखाद्या व्यक्तीला आयुष्यात गुरू असावा’ या कालातीत तत्त्वाने प्रेरित आहे.
Prof. Eknath Pagar, Prof. Nandini Pagar, Dr. Sanghmitra Pagar, Dr. Yogita Pagar, Swanand Pagar,
Prof. Eknath Pagar, Prof. Nandini Pagar, Dr. Sanghmitra Pagar, Dr. Yogita Pagar, Swanand Pagar, Anushree Pagar, Swarup Pagar from Mhasrul along with their families after receiving Sri Guru Paduka who participated in Sri Family Guide Program.esakal
Updated on

SAKAL Shree Family Guide : ‘श्री फॅमिली गाईड’ प्रोग्रॅमची संकल्पना ‘एखाद्या व्यक्तीला आयुष्यात गुरू असावा’ या कालातीत तत्त्वाने प्रेरित आहे. आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक प्रगतीच्या दृष्टीने विचार अन् आचरण करण्यासाठी उपासना आवश्यक असते. अशा सकारात्मक बदलासाठी कृतिशीलता महत्त्वाची ठरते. तीच कृतिशीलता 'श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅम'च्या माध्यमातून प्रत्यक्षात येत आहे. त्यातून आध्यात्मिक आणि आर्थिक प्रगतीचा संगम साधला जाणार आहे. (nashik SAKAL Shree Family Guide Beginning of New Year with guru Paduka)

गुढीपाडव्यापासून ‘श्री फॅमिली गाईड’ प्रोग्रॅमची सुरवात केली जाणार आहे. त्यानिमित्त त्यासाठी नोंदणी केलेल्या राज्यभरातील सदस्यांना श्रीगुरू पादुका समारंभपूर्वक प्रदान करण्यात येत आहेत. सौख्य-समृद्धी आणि समाधानाकडे नेणाऱ्या या आध्यात्मिक संकल्पाची सुरवात करू या...

पादुका देव्हाऱ्यात ठेवताच जीवन लागले सार्थकी

सकारात्मक विचार आणि भक्तिभाव जोपासला, तर जीवनात सुख-शांती मिळते, अशी विचारधारा असलेले ॲड. एकनाथ पगार यांनी वडिलांकडून धार्मिक वृत्तीची प्रेरणा घेतली. याच प्रेरणेतून त्यांनी ‘सकाळ’च्या ‘श्री फॅमिली गाईड’ या अभिनव उपक्रमांतर्गत १८ संत पादुका सोहळ्यात सहकुटुंब येत सहभाग घेतला.

पादुका दर्शनानंतर चारधाम यात्रा झाल्याची भावना व्यक्त करीत ‘पादुका’ प्राप्तीसाठी नोंदणी केली. म्हसरूळ परिसरातील प्रभातनगरमध्ये राहणारे ॲड. एकनाथ शंकरराव पगार व प्रा. नंदिनी एकनाथ पगार यांना श्रीगुरू पादुका घरी येण्याची ओढ लागली होती. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला पादुकांचे आगमन होणार असल्याचा निरोप मिळताच पगार कुटुंबीयांनी श्री स्वामी समर्थांचे आभार मानत पादुका आगमनाची तयारी सुरू केली.  (latest marathi news)

Prof. Eknath Pagar, Prof. Nandini Pagar, Dr. Sanghmitra Pagar, Dr. Yogita Pagar, Swanand Pagar,
Gudi Padwa 2024 : ‘पुलं’च्या जीवनपट आनंदयात्रेने नववर्षाचा प्रारंभ

मंगळवारी सकाळी घराला आकर्षक फुलांची आरास, अंगणात सुंदर रांगोळी आणि घराची शोभा वाढविणारी गुढी उभारली. मंगलमय वातावरणात ‘सकाळ’ चे उपवृत्तसंपादक प्रशांत कोतकर व सहाय्यक व्यवस्थापक (वितरण) अभिजित गरुड यांनी श्रीगुरू पादुका ॲड. एकनाथ व प्रा. नंदिनी यांच्याकडे सुपूर्द केल्या. डॉ. योगिता दिनेश पगार व डॉ. संघमित्रा तुषार पगार या दोन्ही सुनांसह स्वानंद, स्वरूप, अनुश्री, चिन्मयी या नातवंडांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

सर्वांनी श्रीगुरू पादुकांचे विधिवत पूजन करीत दर्शन घेतले. पंचामृताने स्नान घालून श्रीगुरू पादुकांना देव्हाऱ्यात विराजमान केले. हा अनोखा सोहळा आपल्या घरी पार पडल्याचे समाधान व्यक्त करताना ॲड .पगार यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वाणिज्य आणि विधी विद्याशाखेचे प्राध्यापक राहिलेले ॲड. पगार यांनी नाशिकमधील विविध शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापन समितीवर काम केले आहे.

आपल्या ७५ वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्यात अध्यात्माच्या मार्गाने सुख-समृद्धी मिळाली. गुरू पादुका आमच्या घरी विराजमान झाल्याने आमचे जीवनच सार्थकी लागल्याची भावना त्यांनी बोलून दाखविली. स्वामी समर्थांची सेवा करणाऱ्या प्रा. नंदिनी पगार या सप्तशृंगी देवीच्या निस्सीम भक्त आहेत. देवीची आराधना आणि स्वामींची सेवा यातून अध्यात्माच्या मार्गाने जीवन जगत असल्याचा भक्तिभाव त्यांनी व्यक्त केला. ‘सकाळ’च्या श्री फॅमिली गाईड या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात निश्‍चितपणे बदल घडेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

Prof. Eknath Pagar, Prof. Nandini Pagar, Dr. Sanghmitra Pagar, Dr. Yogita Pagar, Swanand Pagar,
Shri Family Guide: ‘श्री फॅमिली गाईड’ संपूर्ण कुटुंबाला मार्गदर्शक, आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांची भावना

देवाचे अस्तित्व मान्य

वैद्यकीय क्षेत्रात असलेल्या डॉ. योगिता पगार व डॉ. संघमित्रा पगार यांनी श्रीगुरू पादुकांचे औक्षण केले. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलो, तरी देवाचे अस्तित्व आम्हाला मान्य असल्याने देवाची भक्ती आम्ही करतो. या भक्तिभावनेमुळेच गुढीपाडव्याच्या शुभदिनी श्रीसद्‌गुरू आमच्या घरी विराजमान झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

''साधू, संत आणि अध्यात्म यांचा संगम घडविणाऱ्या श्री फॅमिली गाईडच्या माध्यमातून देशातील थोर १८ संत-महंतांच्या पादुकांच्या दर्शनाचा अभूतपूर्व सोहळा अनुभवण्याची २६ व २७ मार्च रोजी वाशी येथे संधी मिळाली. या अनुपम्य सोहळ्यातच श्रीगुरू पादुका घरी घेऊन जाण्याची प्रेरणा मिळाली. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या पादुका घरातील देव्हाऱ्यात ठेवताना जीवन सार्थकी लागले.''- ॲड. एकनाथ पगार, नाशिक

Prof. Eknath Pagar, Prof. Nandini Pagar, Dr. Sanghmitra Pagar, Dr. Yogita Pagar, Swanand Pagar,
Sri Family Guide initiative: ही सूर-संध्या गुरुवंदनेसाठीच! शंकर महादेवन यांनी सांगितला आध्यात्मिक गायनाचा अनुभव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.