SAKAL Special : चालता- बोलता! आचारसंहितेची भोकाडी नको

SAKAL Special : ‘शासकीय काम, सहा महिने थांब’ अशी आपल्याकडे उपरोधिक म्हण आहे. त्यात आचासंहिता म्हटले, की ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशीच काहीशी गत असते.
code of conduct
code of conductesakal
Updated on

आचारसंहितेची भोकाडी नको

‘शासकीय काम, सहा महिने थांब’ अशी आपल्याकडे उपरोधिक म्हण आहे. त्यात आचासंहिता म्हटले, की ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशीच काहीशी गत असते. त्याचे कारण म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, कायम करणे या मागणीसाठी आंदोलन झाले.

यात आक्रमक झालेल्या कर्मचाऱ्यांनी प्रशासकासमोरच ठिय्या मांडला. त्यावर प्रशासकांनी मागण्यांबाबत कायदेशीर अडचण असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करत, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने निर्णय घेणे शक्य नसल्याचे सांगितले.

असे असतानाही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम होते. परंतु, अधिकाऱ्यांकडून वारंवार आचारसंहिता असल्याचे सांगितले जात होते. अखेर एका संतप्त झालेल्या कर्मचाऱ्याने आम्हाला आचारसंहितेची भोकाडी करू नका, मागण्या मान्य करा, असे सुनावले.

(nashik SAKAL Special chalta bolta Do not bother with code of conduct )

विषय आहे अधिकाराचा...

ओझर नगर परिषदेचे प्रशासक तथा प्रभारी अधिकारी नेमके कधी येतात, याची माहिती घेत असलेले वारकरीबाबा अनेक खेट्या मारून ताटकळले होते. वरच्या मजल्यावर विमानाच्या खाली येता-जाता त्यांचे लक्ष त्या पडद्याच्या खोलीकडे जाई.

दोन तास होऊन गेले, बाबा जाम वैतागले, त्यातच त्यांच्या समोर साहेबांचे उजवे खास येऊन म्हटलेच ‘तुमचे काम झाले आहे फक्त सही बाकी आहे..’ सारखे तेच तेच वाक्य ऐकून बाबा संतप्त झाले. त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ते म्हटले, की मुख्यमंत्री हजर नसताना उपमुख्यमंत्री राज्य चालवतात मग तो नियम इथे का लागू नाही?

उपसाहेब बोलले तिकडे चालते, इकडे विषय अधिकाराचा आहे, तोच साहेबांकडे आहे आम्ही काय करू बाबा? बाबा म्हणे आता शेवटचं विचारतो, साहेब कधी येणार? सगळे एकमेकांकडे बघत काहीच बोलेना. अखेर ठावठिकाणा मनात ठेवून बाबांनी कविता सादर केली.

‘सूर्यकिरणं कुठेही पडो ती वायुपुत्रासारखी असायला हवीत, सिद्धरूप कुणाचेही असो ते जया तीत असायला हवे, प्रशांत महासागराचा अभ्यास कितीही मोठा असो, त्याला सूर्याच्या किरणांपुढे शांतच राहावं लागतं’ म्हणून इमान ब्रॅन्डची शाही मिसळून सही लवकर करा. कारण माझे काही खरे नाही बुवा... बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल म्हणत बाबा घरी निघून गेले.(latest marathi news)

code of conduct
SAKAL Special : चालता-बोलता; ...अन्‌ वळविली गाडी!

उमेदवारांचा पाळणा

सध्या गावोगावी यात्रांचा हंगाम सुरू आहे. यात्रा म्हटले, की वेगवेगळ्या प्रकारची दुकाने थाटली जातात. पोरांना खेळणी, खाऊ व इतर वस्तूंच्या खरेदीबरोबरच पाळणा हा सर्वांच्या आवडीचा खेळ या यात्रेत असतोच. त्याला रंगबेरंगी रोषणाई केली जाते.

गोल-गोल फिरणारी ही रोषणाई सर्वांनाच आकर्षित करते. त्यात बसल्यावर कधी खाली, तर कधी वरपर्यंत घेऊन जाण्याची गंमतच माणसांना यात्रेचा आनंद देते. यात्रेचा एवढा महिमा सांगण्याचे कारण म्हणजे, सध्या लोकसभेची यात्रा भरली आहे.

नाशिकचे इच्छुक या पाळण्यात बसले आहेत आणि गोल-गोल फिरण्याचा मनोमन आनंद ते घेत आहेत. पाळण्याबरोबर फिरताना एखादा इच्छुक खाली आला, की दुसरा आपोआप वर जातो. तो खाली आला, की तिसरा वर जातो. काही क्षण का असेना; पण आपली ‘हवा’ तयार झाल्याचा आनंद त्याला ‘आकाश ठेंगणे’ करून जाते.

असो, यात्रा सुरू होऊन महिना उलटला. आता वेळ संपत आली म्हणून काही लोक कंटाळून उतरूनही गेले; पण पाळणा काही थांबायचे नाव घेईना. उरले-सुरले इच्छुकही आता अंगाई गीत ऐकत झोपण्यावर आले आहेत.

code of conduct
SAKAL Special : चालता- बोलता! त्याला शब्दच सुचेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.