SAKAL Special : चालता- बोलता! निवडणुका लावा हो

SAKAL Special : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मुदत संपली असून जिल्हा परिषदेसह, महापलिका, पंचायत समित्यांवर प्रशासन राज आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 esakal
Updated on

निवडणुका लावा हो..

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मुदत संपली असून जिल्हा परिषदेसह, महापलिका, पंचायत समित्यांवर प्रशासन राज आहे. प्रशासन राज येऊन तब्बल दोन वर्षे पूर्ण झाली आहे. मात्र, अद्यापही जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या नाही. ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रक्रिया सुरू असल्याने तारीख पे तारीख खेळ सुरू आहे.

यात निवडणुका होत नसल्याने इच्छुकांची घालमेल होत आहे. झाले असे की, जिल्हा परिषदेत काही माजी सदस्य कामानिमित्त दाखल झाले. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांना लोकसभा निवडणुकीत कोण आहे उमेदवार अशी विचारणा केली.

त्यावर राजकीय फड चांगलाच रंगला. निवडणुकीसाठी तुम्हाला काम करावे लागेल नाही तर, तिकीट नाही मिळणार असे एका कार्यकर्त्यांना त्यांना सांगितले. त्यावर त्या सदस्याने अरे बाबा निवडणुका लाव.. तिकिटाचे मी पाहून घेतो.

फक्त निवडणुका लावा अशी आर्त हाक दिली. त्यावर कार्यकर्त्याने निवडणुका लावणे माझ्या हातात नाही असे सांगितले. त्यानंतर हा चर्चेला विराम देत सर्वजण आप-आपल्या मार्गाने मार्गस्थ झाले.

(nashik SAKAL Special chalta bolta Hold elections marathi news)

अन उपाध्यक्षांनी नियम मोडला

सार्वजनिक वाचनालयाच्या वाङ्‍मयीन पुरस्कार वितरणप्रसंगी एकूण आठ लेखकांना गौरविण्यात आले. प्रत्येक लेखकाला मनोगत व्यक्त करण्यासाठी दोन मिनिटांचा अवधी देण्यात आला. सूत्रसंचालनाचे काम करणारे उपाध्यक्ष प्रत्येक लेखकाला दोन मिनिटांत मनोगत आवरते घेण्यासाठी वारंवार आठवण करून देत राहिले.

त्यामुळे प्रत्येक लेखक इच्छा असूनही अगदी आटोपत्या शब्दांत मनोगत व्यक्त करू लागले; परंतु जो नियम उपाध्यक्षांनी लेखकांसाठी लावला, तोच नियम मोडण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही.

प्रत्येक लेखकाची ओळख करून देताना ते स्वत:च दोन मिनिटांपेक्षाही अधिक बोलत असल्याने नियम केवळ लेखकांसाठी होता, सूत्रसंचालनाला काही मर्यादा नाही, हे सांगायचे मात्र ते विसरले. (latest marathi news)

Lok Sabha Election 2024
SAKAL Special : चालता... बोलता...! कार्यकर्त्यांशी संवाद महत्त्वाचा...

फुटायला तो काय पक्ष आहे का?

उन्हाचा कडाका वाढल्याने सध्या गरिबांच्या फ्रिजला चांगली मागणी आहे. एका झाडाखाली माठ विकायला बसलेल्या व्यक्तीकडे गणू जातो. कसे दिलेत माठ, म्हणून विचारतो आणि काळ्या रंगाचा माठ हातात घेतो. विक्रेता त्या माठाची किंमत सांगतो.

थोडा वेळ माठ इकडून, तिकडून चाचपडून बघितल्यानंतर गणू हळूच विचारतो, पण भाऊ माठ फुटणार तर नाही ना? तापलेल्या तव्यावर पाण्याचा शिडकावा मारावा तसा भाऊ चिडून म्हणाला, ‘फुटायला तो काय राजकीय पक्ष आहे का? की एखाद्या पक्षाचा नेता आहे, आपल्या माठाची ‘गॅरंटी’ आपणच देणार. आता बोला!

Lok Sabha Election 2024
SAKAL Special : चालता-बोलता! तुमचा आमचा संबंध नाही?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.