SAKAL Special : चालता... बोलता...! विद्यार्थ्यांनी शिकवला धडा

SAKAL Special : काही लोक स्वत:ला फार हुशार समजतात. त्यातल्या त्यात शिक्षकांना तर स्वत:च्या हुशारीवर फार आत्मविश्वास असतो.
10th farewell (file photo)
10th farewell (file photo)esakal
Updated on

विद्यार्थ्यांनी शिकवला धडा

काही लोक स्वत:ला फार हुशार समजतात. त्यातल्या त्यात शिक्षकांना तर स्वत:च्या हुशारीवर फार आत्मविश्वास असतो. असाच आत्मविश्वास बाळगणाऱ्या एका शिक्षकाला अचानकपणे ‘सेंड ऑफ’च्या कार्यक्रमात भाषण करायला उठवतात.

आता विद्यार्थ्यांविषयी काय बोलायचे म्हणून त्यांनी लागलीच आपली हुशारी दाखवायला सुरवात केली. मोबाईलमघ्ये निरोप समारंभाचे भाषण कसे करावे, याविषयी एक व्हिडिओ बघितला आणि काही वाक्यांचा स्क्रीन शॉट काढला.

प्रत्यक्ष बोलायला उभ्या राहिल्यानंतर मोबाईलच ऑन होईना. बराच वेळ बोलून झाले तरी मोबाईल काही सुरू होईना. अखेर सर्व विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांनी दोन मिनिटांत आपले भाषण संपवले. वर्षभर शिक्षक शिकवत राहिले. पण शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांनी त्यांना धडा शिकवलाच.

(nashik SAKAL Special chalta bolta Lesson learned by students marathi news)

सभागृहातच वामकुक्षी

सांस्कृतिक असो वा अन्य कार्यक्रम, वेळेत सुरवात होण्याची शक्यता नसते. असाच एक कार्यक्रम निर्धारित वेळेच्या अर्धा ते पाऊण तास उशिराने सुरू झाला. कार्यक्रम दुपारचा होता आणि दोन तासांचा कार्यक्रम तब्बल चार तास लांबला. कार्यक्रम रटाळ होता, असे नाही. परंतु अनेकांना दुपारची पाच-दहा मिनिटांची का होईना वामकुशी घेण्याची सवय असते.

त्यातच सभागृहात एसी होते. त्यामुळे त्या कार्यक्रमासाठी आलेल्या एकाची बहुधा वामकुशीची वेळ असावी. त्यामुळे कार्यक्रम सुरू असतानाच त्याचे डोळे जडावले आणि तो झोपी गेला. झोपही अशी लागली, की काही मिनिटात तो घोरू लागला.

तो घोरू लागताच त्याच्या शेजारी असलेल्या महिलेला काय करावे, काहीच सुचेना... आजूबाजूचे त्या घोरणाऱ्याकडे पाहताना त्याच्या शेजारी असलेल्या महिलेकडेही कटाक्ष टाकू लागले. त्यामुळे त्या महिलेला आणखीच खजिल झाल्यासारखे झाले.

परंतु कार्यक्रम सुरू असल्याने त्या महिलेला घोरणाऱ्याशी आपला काही संबंध नाही हेही सांगता येईना. अखेरीस घोरणाऱ्याच्या दुसऱ्या बाजूने असलेल्या व्यक्तीने झोपी गेलेल्यास धक्का दिला अन्‌ झोपी गेलेल्याची झोपमोड झाल्याने तो सावध होत त्याने मिश्लिक हास्य केले. (latest marathi news)

10th farewell (file photo)
SAKAL Special : चालता...बोलता...! शिरा अन्‌ लापशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.