SAKAL Special : चालता- बोलता! कांदा वादा करतो की काय

SAKAL Special : कांदा जिल्ह्यातील प्रमुख पीक. कांद्याला भाव मिळाला तसेच कांद्याचे भाव पडले, तरी जिल्ह्यातील कांदा देशभरात गाजत असतो.
onion
onionesakal
Updated on

कांदा वादा करतो की काय...

कांदा जिल्ह्यातील प्रमुख पीक. कांद्याला भाव मिळाला तसेच कांद्याचे भाव पडले, तरी जिल्ह्यातील कांदा देशभरात गाजत असतो. कांद्यावरील निर्यातबंदी अन् त्यावरील आंदोलनामुळे तर कांद्याचा प्रश्न चागंलाच गाजला. त्यामुळे कांदा हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न.

आता तर लोकसभा निवडणूक सुरू आहे, यात जिल्ह्यातील कांदाप्रश्न ऐरणीवर आलेला दिसत आहे. तर, झाले असे की, मतदारसंघात प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात, गाठीभेटीचे सत्र सुरू आहे. यात शेतकरी मतदारराजा हा कांद्यावरच अधिक चर्चा करत आहे.

गावात शिरले, की कांदा प्रश्नावर सरबत्ती सुरू होते. बैठका असो की सभा, यात शेतकरी विविध चर्चा करतात अन् या प्रश्नावर विचारणा करतात. त्यामुळे या निवडणुकीत कांदा वादा करतो की काय... अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगत आहे.

(nashik SAKAL Special chalta bolta onion argues that what marathi news )

...अन्‌ अनेक अचंबित

नाशिक रोड येथे शिवसेना (उबाठा) गटाचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी नुकतीच नाशिक रोड येथे फेरी काढली होती. त्या दरम्यान नाशिक रोड येथे भाजपतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चित्ररथ स्वागतासाठी एक व्यासपीठ उभारले होते.

त्या व्यासपीठावर भाजपचे पदाधिकारी व जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी श्री. वाजे, दत्ता गायकवाड, वसंत गिते हे भाजपच्या व्यासपीठावर गेले. सूत्रसंचालकाने ‘नाशिकचे भावी खासदार राजाभाऊ वाजे यांचे स्वागत’ असा वारंवार उल्लेख केला.

महायुतीचा नाशिकमध्ये उमेदवार राहणार असताना तो सूत्रसंचालक पदाधिकारी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा भावी खासदार असा वारंवार उल्लेख करीत होता. हा उल्लेख उपस्थितांमध्ये एकच चर्चेचा विषय ठरला.  (latest marathi news)

onion
SAKAL Special : चालता-बोलता! घोळ मिटवा...उमेदवार ठरवा

फ्लाइट मोडवर

महिला कधी काय करतील, याचा काही थांगपत्ता लागत नाही. आता उन्हाळा सुरू असल्यामुळे शाळा सकाळी भरतात. तसे म्हटलं तर उन्हाळी सुट्या लागल्या आहेत. पण शिक्षकांना ड्यूटी असते. तर झाले असे, की एका शाळेच्या शिक्षिका सकाळी झोपेतून उठल्या आणि शाळेची तयारी करू लागल्या.

बराच वेळ झाला तरी त्यांना शाळेत जाण्यासाठी इतर शिक्षकांचा फोन काही येत नव्हता. नियमित वेळेपेक्षा अर्धा तास अधिक झाला तरी आपल्याला फोन का येत नाही, म्हणून त्या वारंवार मोबाईल चेक करुन बघत.

पण फोन काही आलेला नसायचा. एवढ्या वेळेत चहा पिऊन झाला. चक्करही मारून झाला. पण फोन काही येईना म्हणून त्यांनी थेट नियोजित जागेवर जाणे पसंत केले, तर तिथे त्यांना घेण्यासाठी गाडी येऊन उभी होती.

तेव्हा मोबाईल चेक केला तर तो ‘फ्लाइट मोड’वर असल्यामुळे फोन लागत नसल्याचे इतर शिक्षकांनी सांगितले. आपणच रात्री झोपताना ‘फ्लाइट मोड’वर केला होता, याचाच विसर त्यांना पडला, आता बोला..!

onion
SAKAL Special : चालता-बोलता! निवडणुकांचा हंगाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.