SAKAL Special : चालता- बोलता..! तुमचे मौनव्रत सुटले का?

Lok Sabha Election 2024 : ...इतक्यात एका पत्रकाराने त्यांना ‘तुमचे मौनव्रत सुटले का?’ असे खोचकपणे विचारले! त्यावर ‘बाबा’ भडकले आणि प्रतिक्रिया न देताच माघारी फिरले.
Shantigiri Maharaj application filed
Shantigiri Maharaj application filedesakal
Updated on

सध्या जिकडे तिकडे निवडणुकीचे वातावरण तापले आहे. या निवडणुकांच्या रणधुमाळीत दुष्काळही झाकोळला गेलाय, पण आज तो आपला विषय नाही म्हणून त्याविषयी काही बोलायचे नाही. तर झाले असे, की उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या एका नेत्याला ‘बूम’वाल्यांनी अडवले.

अगोदर तर उमेदवार म्हणाले, ‘मी मौन धारण केलंय. पण अर्ज भरून आल्यावर थोडं बोलायला तयार झाले. इतक्यात एका पत्रकाराने त्यांना ‘तुमचे मौनव्रत सुटले का?’ असे खोचकपणे विचारले! त्यावर ‘बाबा’ भडकले आणि प्रतिक्रिया न देताच माघारी फिरले.

पण त्यांचा पिच्छा काही लोक सोडेना, अखेर ‘बाबां’ना भररस्त्यात गाठले. तुम्ही कोणत्या पक्षाकडून अर्ज भरला, ‘एबी’ फॉर्म मिळाला का, असे अनेक प्रश्‍नांची उत्तरे त्यांच्या तोंडी वदवून घेतल्यानंतरच त्यांना सोडले. या उमेदवाराने दिलेली प्रतिक्रियेने महायुतीच्या उमेदवारांना आता रात्रभर झोप लागणार नाही, हे नक्की! (nashik lok sabha election 2024 shantigiriji maharaj applicant)

सत्य- प्रेम- करुणा

सध्या ओझरच्या मुख्यालयात लाखो नागरिकांना ‘सत्य- प्रेम- करुणा’ या तीन शब्दांचा प्रत्यय येत आहे. शहरातील नामवंत जोडगोळीतील एक अंहिसा वादी तर दुसरा खोडसाळ म्हणता येतील. रविवारच्या भाजी बाजारात चक्क ते एकाच्या सुप्त साथीदारासोबत भाजीपाला घेताना दिसले.

लिंबू विक्रेत्याने सांगितले अहो हे रामगड बाहेरील डोंगरात तुमच्या मित्राच्या पाठीमागेच राहतात. गेली अडीच वर्ष मुख्यालयात हडकंप होता. आता मात्र पिन ड्रॉप सायलेन्स झाल्याने एका रामगडच्या समस्याकर्त्याला आपण योगा केंद्रात आल्याचा भास झाला. एरवी साहेब आले की काही जण टोलेजंग फाईली घेऊन रेलचेल करायचे पण त्यांना ही अति सूक्ष्म नियम लावले गेल्याने सर्व ऑनलाइन झाले आहे.

सध्या होतकरू सेवक मात्र एकमेकांकडे नुसते बघत असतात. बाकी जे केबिनमध्ये गेले त्यांना मात्र डाकिया ची पदवी देण्याचा प्रयत्न केला जातो पण त्यांनी ओझरचे पाणी पिल्याने तो होकारण्याचा प्रयत्न सपशेल फोल ठरून जातो. यामुळे सगळे फॉर्म्युला लावूनही कुणी हाताला लागत नाही म्हटल्यावर त्या इमारतीतील निर्दोष पंचवीस जणांनी करुणा रुपी स्वभाव स्वीकारला आहे. परंतु जागा, वार, मजले, एकूण फ्लॅट,साइड मार्जिन आणि मौल्यवान त्रुटी विचारण्याबाबत आजही एकाचा शब्द प्रमाण मानला जातो. यामुळेच इतर सर्वांनी सत्य प्रेम करुणाचा अंगीकार करून टाकला आहे. (Latest Marathi News)

Shantigiri Maharaj application filed
SAKAL Special : चालता-बोलता : मला उमेदवारी करायची आहे

नुसतेच ‘प्रदर्शन’, शक्तीचा पत्ता नाही

उमेदवार म्हटले की शक्तीप्रदर्शन आलेच. त्यात उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस म्हणजे आपली ताकद दाखवून देण्याचा अधिकृत दिवसच समजला जातो. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाचा उमेदवार आपल्या परीने ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतो. स्वत:च्या ताकदीवर ‘निर्भय’पणे पक्ष उभा केलेला एक नेता आपल्या सवंगड्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात येतो.

आता हा नेताही रिंगणात उतरणार म्हणून लोक त्याच्याकडे बघायला लागतात. पण उमेदवारी अर्ज घेण्यासाठी एवढी गर्दी जमविल्याचे तो सांगतो. आपण ‘भावी’ उमेदवार असल्याची त्याची वल्गना ऐकून बाकीचे उमेदवार मात्र, त्याच्यापासून चारहात लांब उभे राहतात.

यांचे प्रदर्शन बघून आपला ‘कॉन्फिडन्स’ कमी व्हायला नको, म्हणून तेथून काढता पाय घेतात. लोक आपल्या जवळही येत नाहीत म्हटल्यावर ‘भावी’ उमेदवारही अर्ज घेऊन माघारी फिरतात, बघू आता कधी अर्ज भरतात अन्‌ काय शक्तीप्रदर्शन करतात ते. (Latest Marathi News)

Shantigiri Maharaj application filed
SAKAL Special : चालता-बोलता! तुला तिथं येऊन मारीन!

आपलं मत समोरच्याला फिक्स...

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोचला आहे, तर उमेदवारांनीही आपापले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले आहेत. या वेळी काही उमेदवारांनी शक्तिप्रदर्शनही केले. असेच शक्तिप्रदर्शन एका उमेदवाराने केले. त्या शक्तिप्रदर्शनात ग्रामीण भागातून समर्थक, कार्यकर्ते आले होते.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्याने कार्यकर्ते बाहेर तळपत्या उन्हात थांबून होते. असेच चार-पाच कार्यकर्ते झाडाखाली उभे होते. त्यांची निवडणुकीचीच चर्चा सुरू होती. आपल्या उमेदवाराने जोरात शक्तिप्रदर्शन केल्याचे सांगत, एकाने आपले मत फिक्सच आहे राव आता, असे मत मांडले.

तर, दुसरा लगेच म्हणतो, ‘‘ये बाबा असं काही नसतं. हे एवढे आलेत ना त्यातील ५० टक्क्यांचे पण मतं याला नाहीत. उगाच गाड्या होत्या म्हणून आले. माझं स्वत:चच घे. मी समर्थक म्हणून आलो खरा; पण आपलं मत समोरच्या पार्टीला फिक्स आहे. त्यो कामाचा माणूस आहे. हा काय करणार रताळ्या... सोबतचे दोघे-तिघे टाळ्या देत हसले.

Shantigiri Maharaj application filed
SAKAL Special : चालता बोलता! शेवटच्या दिवश मिळेल चान्स!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.