SAKAL Special : चालता...बोलता...! शिरा अन्‌ लापशी

SAKAL Special : शाळेतील शेवटचा दिवस म्हटला, की विद्यार्थ्यांना गहिवरून येते. पण यापुढे आपण महाविद्यालयात जाणार असल्याची उत्सुकताही त्यांच्या मनात असते.
shira
shiraesakal
Updated on

शिरा अन्‌ लापशी

शाळेतील शेवटचा दिवस म्हटला, की विद्यार्थ्यांना गहिवरून येते. पण यापुढे आपण महाविद्यालयात जाणार असल्याची उत्सुकताही त्यांच्या मनात असते. शाळेतील शेवटचा दिवस आनंदात घालवावा, यासाठी एका शाळेने छोटेखानी पार्टीचे आयोजन केले होते. अर्थातच त्याचा खर्च विद्यार्थ्यांनी उचलला असल्यामुळे मेन्यूही त्यांनीच ठरवला आहे.

आपल्या उपरोक्ष मेन्यू ठरविल्याची गोष्ट मुख्याध्यापकांच्या लक्षात येते आणि ते पुन्हा शिक्षकांची मीटिंग घेतात. त्यात पूर्ण मेन्यूकार्डच बदलून टाकतात. नवीन मेन्यूमध्ये शिरा अन्‌ लापशीचा समावेश झाल्याचे बघून विद्यार्थ्यांना अक्षरश: भोवळ आली. त्यांनी ‘सेंडऑफ’च्याच दिवशी दांडी मारायचे ठरवले आहे. तेव्हा ही लापशी आता मुख्याध्यापकांनाच खावी लागणार बहुधा.

(nashik SAKAL Special chalta bolta shira and porridge marathi news)

मंत्रिमहोदय गेले कुणीकडे..?

महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठात दीक्षान्त समारंभ उत्‍साहात पार पडला. व्‍यासपीठीय कार्यक्रम झाल्‍यावर सभागृह आवारात सुवर्णपदक विजेत्‍यांबरोबर ग्रुप फोटो काढायचा होता; पण वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ अन्‌ त्‍यांच्‍याबरोबरचे मान्‍यवर चालत पुढे निघून गेले. पदकविजेते विद्यार्थी ठरलेल्‍या आसनव्‍यवस्‍थेवर बसले खरे; पण मंत्रिमहोदय काही येईना.

काही मिनिटे वाट पाहिल्यावर चलबिचल सुरू झाली. मंत्रिमहोदय गेले कुठे? यावर चर्चा रंगायला लागल्‍या अन्‌ गटागटांत हास्‍यविनोद फुलू लागले. कुणी म्‍हटले, जेवायला थांबले असतील. कुणी म्‍हणे, महत्त्वाची चर्चा सुरू असल्‍याने वेळ लागेल. अखेर मंत्रिमहोदय दाखल झाल्‍यावर चर्चांना विराम लागला.

shira
Sakal Special : चालता...बोलता...! विज्ञानाचे अनोखे प्रयोग

बाय देऊ का, आम्हाला सांभाळा

शासकीय अधिकारी व पत्रकार यांचे विळा-भोपळ्यासारखे नाते असते. बातमीच्या माध्यमातून यात कधी कटुता निर्माण होते; तर कधी मधुर संबंध प्रस्थापित होतात. परंतु, कायमस्वरूपाचे वैर निर्माण होऊ नये यासाठी मिनी मंत्रालयाने क्रीडा स्पर्धेत पत्रकारांचाही समावेश करून रस्सीखेच स्पर्धा घेतली.

पत्रकारांबरोबर रस्सीखेच खेळायचे म्हटल्यावर, हरलो अन जिंकली तरी अधिकाऱ्यांमध्येही काहीशी धास्ती होती. त्यावर तोडगा काढायचा म्हणून अधिकाऱ्यांनी अजब शक्कल लढविली. स्पर्धेत पूर्वीच अधिकाऱ्यांनी पत्रकारांना बाय देण्याची ऑफर देऊन टाकली.

आम्ही तुम्हाला बाय देतो. तुम्ही आम्हाला वर्षभर सांभाळून घ्या, असे अधिकाऱ्यांनी एक प्रकारे आमिष दाखविले. आमिषाला बळी पडतील ते पत्रकार कसले? पत्रकारांनी रस्सीखेचचा सामना घेतला. (latest marathi news)

shira
Sakal Special : चालता... बोलता...! झेडपीत यावे की नाही...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.