SAKAL Special : चालता... बोलता...! गतिरोधक केले; पण...

SAKAL Special : नाशिकमध्ये अनेक मुख्य मार्गांवर सध्या गतिरोधक करण्याचे काम सुरू आहे. त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अनेक ठिकाणी गतिरोधक करण्यात आले आहेत.
speed breaker
speed breakeresakal
Updated on

गतिरोधक केले; पण...

नाशिकमध्ये अनेक मुख्य मार्गांवर सध्या गतिरोधक करण्याचे काम सुरू आहे. त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अनेक ठिकाणी गतिरोधक करण्यात आले आहेत. सातपूर पोलिस ठाणे, आयटीआय सिग्नल, सातपूर गाव, महिंद्र सर्कल, सातपूर कॉलनी फाटा आणि पपया चौफुली येथे दोन्ही बाजूंनी गतिरोधक करण्यात आले आहेत.

एरवी भरधाव जाणाऱ्या वाहनांना अचानक झालेल्या या गतिरोधकांची कल्पना नसल्याने दुचाकीसह चारचाकी त्याच गतीने जात असल्याने गतिरोधकांच्या जागी आदळत आहेत.

यातून दुचाकी विशेषतः ॲक्टिव्हा जागीच टर्न घेत आहेत, छोटे-मोठे अपघातही होत आहेत, त्यामुळे या गतिरोधकांच्या जागी पांढरे पट्टे मारणे तसेच गतिरोधक आहेत, हे सूचित करणारे रिफ्लेक्टर तरी लावावेत. जेणेकरून जाणीव होऊन अपघात टळतील, असे त्यावर आदळलेल्या एका दुचाकीस्वाराने तावातावाने सांगितले. (nashik SAKAL Special chalta bolta speed breaker but marathi news)

speed breaker
SAKAL Special : चालता... बोलता...! न गेलेली सहल...

आमदारांचे पीए

‘गाव करी ते राव न करी’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. त्याच अर्थाने आमदारापेक्षा त्यांचा पीए जास्त काम करतो. नवनवीन युक्त्या सुचविणे, प्रलंबित कामे मार्गी लावणे, लोकांचे प्रश्न सोडविणे ही प्रमुख जबाबदारी पीएंवर असते. पण, हल्ली कामाचे स्वरूप इतके बदलले आहे, की लोकांपेक्षा ठेकेदारांचीच जास्त कामे पीएंना करावी लागतात.

याच व्यथांनी उद्विग्न झालेल्या एका पीएच्या हातावर ठेकेदार फाईल ठेवतो आणि भाऊ आपले एवढं काम पटकन मार्गी लावा म्हणतो. त्या फाईलकडे पाहून या पीएंना एक ओळ आठवते, ‘कोण होतास तू, काय झालास तू..?’ (latest marathi news)

speed breaker
SAKAL Special: चालता... बोलता! ...अन्यथा आपलं बजेट होईल

वासुदेव अन टाईमपास

ग्रामीण भागातील लोकांना वासुदेवाविषयीचे आकर्षण आजही कायम आहे. शहरात आले तरी हे लोक वासुदेवाला विसरत नाहीत. आंदोलनाच्या निमित्ताने गेल्या आठ दिवसांपासून शहरात मुक्काम ठोकलेल्या आंदोलकांना भेटण्यासाठी वासुदेव येतो.

पोस्ट ऑफिससमोर माझा मोठा कार्यक्रम आहे, सगळ्यांनी तिकडे या म्हणून तो दवंडीच पिटवतो. इथे बसण्यापेक्षा थोडावेळ जाऊन येऊ म्हणून काही महिला त्याच्या मागे निघतात. पुढे वासुदेव आणि मागे महिलांची रांग. चालत-चालत पोस्ट ऑफिससमोर पोहोचतो.

आपला कार्यक्रम इथे नाही तर मुंबई नाका परिसरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात असल्याचे त्याला सांगण्यात येते. आता तिथे कसे पोहोचायचे म्हणून वासुदेव एका रिक्षाला हात देतो आणि चकटन निघून जातो. महिलांना मात्र आल्यापावली परत फिरावे लागते.

speed breaker
SAKAL Special : चालता... बोलता...! मागल्या बार भी असे फसवलं होत

शेवटी कामच महत्त्वाचे...

नाशिक रोड येथे एका मंदिराच्या नूतनीकरण कामाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी माजी आमदाराचे नाव न घेता संयोजकांनी सांगितले, की या गजानन महाराज मंदिरात जे खोटे बोलतात, ते पुन्हा येत नाहीत.

त्यानंतर विद्यमान आमदाराचे भाषण झाले, त्यांनी माजी आमदाराचे नाव न घेता जेव्हा निवडणुकीत उभा होतो, तेव्हा मला काही कार्यकर्ते येऊन सांगत होते, की भाऊ समोरचा उमेदवार कृष्णभक्त आहे.

मी त्यांना सांगत होतो, की तो कृष्णभक्त असेल; परंतु माझा जन्मच हा गोकुळाष्टमीचा आहे, त्यामुळे राम असो कृष्ण असो, शेवटी भक्ती व भावना महत्त्वाची आहे. जो जनतेचे काम करतो, त्याला देवांचा व जनतेचा आशीर्वाद मिळतोच, असा टोला लगावला.

speed breaker
SAKAL Special : चालता... बोलता...! लसणाच्या मुळीत नांगर अडकला!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.