हमारा वोट किसकू है!
निवडणूक कोणतीही असो, मतदानाची वर्गवारी करीत असताना त्याकडे धार्मिक आणि सामाजिक नजरेतूनच पाहिले जाते. लोकसभा निवडणुकीकडे उमेदवारांकडून अशाप्रकारे आखणी करून नियोजन केले जाते. यंदा लोकसभा निवडणुकीत मात्र धार्मिक रंग लपून राहिलेला नाही. त्यामुळे एक विशिष्ठ समाजाची या निवडणुकीतील भूमिका महत्त्वाची ठरणार होती.
शहरातील एका मतदान केंद्रावर दोघांमध्ये संवाद सुरू असताना एकाने आज हमने वोटिंग किया, फिर भी हमारे तरफ अलग नजर से देखा जाता है... क्यू अभी इस इलेक्शन में हमने जिसको भी वोट किया, वो मुसलमान है क्या, हिंदूही है ना... तो क्यू कुछ लोक हिंदू-मुस्लिम करते हो... हे बात गलत है की नहीं...’ अशा शब्दात बोलत होता. ते ऐकून जातीय भेद करणाऱ्या चांगलीच चपराक होती.
( SAKAL Special chalta bolta Whose vote is it )
‘वेटिंग’ला वैतागला मतदाता !
सिडको महाविद्यालय.. वेळ सकाळी अकराची.. मतदानासाठी बूथवर लांबपर्यंत रांगा लागलेल्या.. खासगी कंपनी, कार्यालयांनी मतदानासाठी कर्मचाऱ्यांना दोन तासांची अवधी दिला पण, उन्हाने आधीच हैराण झालेला, पंख्याची सोय नसताना, रांगेत ताटकळत उभे राहण्याला सर्वसामान्य मतदाता चांगलाच वैतागला.
बरं रांग पुढे सरकेना.. आणि नंबर आल्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना आधी मतदानासाठी बूथमध्ये सोडत असल्याने रांगेत उभा राहणारा मतदाता अधिकच खवळला. सकाळी ११ पर्यंत किती मतदान झाले, त्याची आकडेवारी देण्यासाठी काही काळ मतदान थांबविण्यात आले.
कंपनीने तासाभराचा अवधी दिलाय लवकर गेलो नाही तर पगार कट करतील, आधी बूथपर्यंत तर पोचू द्या मग मोबाइल बाहेर ठेवतो, फास्ट करायला सांगा कर्मचाऱ्यांना की आम्ही मध्ये जाऊ, असे संवाद सुरू झाले. प्रत्येक मतदाराला अर्धा तासापेक्षा जास्त वेळ रांगेत उभे लागल्यामुळे मतदाता ‘वेटिंग’ मुळे अधिक वैतागला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.