विरोधाच्या रूळांवर इंजिन धावणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर त्यांचे महायुतीत स्थान पक्के झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दिल्लीत राज ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली. मागील निवडणुकीत नरेंद्र मोदींसह याच अमित शहांवर राज यांनी टीकेच्या फैरी झाडल्या होत्या. मोदी- शहा यांना विरोध करीत इंजिन पुढे हाकले होते.
‘लाव रे तो व्हिडिओ’ तर चांगलाच गाजला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत महायुतीत सामील होत मोदी-शहांना साथ देऊ पाहणाऱ्या राज ठाकरेंचे इंजिन आता त्यांनीच विरोध केलेल्या रूळांवर धावणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यात कार्यकर्त्यांची मोठी गोची होत आहे. नेमकी काय भूमिका घ्यावी, हेच उमजत नसल्याने तेही सैरभैर झाले आहेत.
(nashik SAKAL Special chalta bolta Will engine run on opposition lines marathi news )
अलबत्या-खलबत्या...
लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असतानाच सर्वत्र माध्यमांवर राजकीय पक्षांकडून खलबते सुरू असल्याच्या बातम्यांतून खलबतं हा शब्द नागरिकांच्या इतका पचनी पडला आहे, की सामान्य विषयावर बोलतानाही खलबते शब्द तोंडून बाहेर पडू लागला आहे.
त्याचे झाले असे, की अलबत्या-गलबत्या नावाचं एक बालनाट्य जे रसिकांच्या चांगलंच पसंतीस पडलं आहे, त्याचा नाशिकमध्ये प्रयोग व्हावा, या विषयावर काही नाट्यप्रेमींच्या चर्चा सुरू होत्या.
त्यात एकाने मला अलबत्या-खलबत्या नाटक पाहायची खूप इच्छा आहे, असे म्हणताच इतरांनी त्याचे बोलणे पकडले अन् राजकीय घडामोडींच्या नादात तुझंही खलबतं झालं आहे, असं म्हणत खेचायला सुरवात केली. आता बोला..! (latest marathi news)
आचारसंहिता आहे भाऊ...
शासकीय कार्यालयांमध्ये सामान्य लोक कामांसाठी येतात, त्या वेळी अधिकारी, कर्मचारी वेळेत काम करीत नसल्याचा बहुतेकांचा अनुभव असतो. त्यामुळे कामे होत नसल्याची ओरड होऊनही अधिकारी, कर्मचारी ढिम्म आपल्या सोयीने कामे करतात.
मिनी मंत्रालय ओळख असलेल्या जिल्हा परिषदेत सामान्यांची कामे होत नसल्याची मोठी ओरड आहे. जिल्हा परिषदेत आल्यावर वेळेत कामे होत नाहीत, सतत फेऱ्या माराव्या लागतात. झाले असे, की जिल्हा परिषदेत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. एका विभागात ग्रामीण भागातील सामान्य व्यक्ती कामासाठी दाखल झाली.
त्याने कर्मचाऱ्यास कामही सांगितले. अर्धा ते पाऊण तास व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेतले अन त्यानंतर त्या कर्मचाऱ्याने थेट आचारसंहिता आहे भाऊ, तुम्ही आचारसंहिता झाल्यावर या. हे ऐकून ती व्यक्ती खाली मान घालून निमूटपणे निघून गेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.