SAKAL Special : चालता... बोलता...! ऊर्जा मिळाली, ती किती कायम राहील...

SAKAL Special : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांनी पक्षाचा १८ वा वर्धापन दिन यंदा नाशिकमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा केला.
Raj Thackeray
Raj Thackerayesakal
Updated on

ऊर्जा मिळाली, ती किती कायम राहील...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांनी पक्षाचा १८ वा वर्धापन दिन यंदा नाशिकमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा केला. राज ठाकरे नाशिकमध्ये आले, की त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांमध्ये ऊर्जा संचारते.

मात्र त्यांची पाठ फिरताच ती मंदावते, असा अनुभव स्वतः राज ठाकरे यांनी घेतला आहे. त्यातच पक्षातील उफाळून आलेल्या गटबाजीबाबत राज ठाकरेंनी त्यांच्या सैनिकांना सज्जड दमदेखील भरला आहे.

वर्धापन दिन कार्यक्रमानिमित्त शहरात मनसे कार्यकर्ते चांगलेच सक्रिय झाल्याचे शहरवासीयांनी अनुभवले. मात्र राज ठाकरे आता मुंबईला गेले, त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांमध्ये संचारलेली ही ऊर्जा किती काळ तग धरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(nashik SAKAL Special chata bolta Energy received how long will it last marathi news)

तुम्हीचा आम्हाला दिसत नाहीत...

मनसेच्या अठराव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी राज्यभरातून मनसे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाशिकमध्ये आले होते. राज ठाकरेंचे अत्यंत जवळचे असणारे मनसे नेते बाळा नांदगावकर वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी गाडीत बसले. तेव्हा काही उत्साही पत्रकारांनी त्यांना गाठत प्रश्न विचारायला सुरवात केली.

त्यात एका युवा पत्रकाराने ‘मनसे पुढील काळात दिसेल का’ असा प्रश्न केला. यावर बाळा नांदगावकर खवळले अन् तुम्हीच पत्रकार आम्हाला कुठे दिसत नाही, आमचा पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात दिसतो, असे उत्तर देत चालकाला गाडी हाकण्याचा इशारा केला. (latest marathi news)

Raj Thackeray
SAKAL Special : चालता... बोलता...! लसणाच्या मुळीत नांगर अडकला!

भाऊ तुम्हाला गाडी विकायची का?

‘कोणाचं काय तर कुणाचं काय’ या म्‍हणीची प्रचीती अनेकांना येत असते. असाच एक विनोदी प्रसंगी नाशिक शहरात एका युवकासोबत घडला. झालं असं, की मोकळ्या भूखंडावर दुचाकी उभी करत एक युवक चारही बाजूंनी गाडीचा फोटो काढत होता.

नेमकं काय घडलं, या विचाराने तिथला सुरक्षारक्षक धावत आला अन्‌ विचारपूस केली. त्‍याची समजूत काढत युवक पुन्‍हा कामाला लागला. इतक्‍यात आणखी एक मुलगा येऊन ‘भाऊ तुम्‍ही इन्‍शुरन्‍स काढतात का?’ अशी विचारणा केली.

काहीशा तणावात असलेल्‍या युवकाच्‍या चेहऱ्यावर या प्रश्‍नामुळे हसू आले अन्‌ नकारार्थी मान हलवत तो पुन्‍हा फोटो काढायला लागला. इतक्‍यात उपस्‍थित मुलाने प्रश्‍नाचा आणखी एक बाण सोडला.

‘भाऊ तुम्‍हाला गाडी विकायची आहे का?’ हे ऐकताच आणखी प्रश्‍न येऊ नये म्‍हणून, युवक म्‍हणाला की ‘दादा, ऑनलाइन इन्‍शुरन्‍स घेतलं, आता त्‍याचं इन्‍स्‍पेक्‍शन पूर्ण करतोय’, असे उत्तर दिले. उत्तर ऐकताच दोन्ही युवकांसह उपस्‍थितांमध्ये हशा पिकला.

Raj Thackeray
SAKAL Special : चालता... बोलता...! गाजरावर चाले राजकारण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.