नारोशंकराची घंटा : ...अन् ‘ठाकरी’ आवाज आला

Latest Nashik News : एका उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यास त्या पक्षाच्या गीतांसह नेत्यांच्या भाषणांच्या चित्रफिती दाखविण्याच्या सूचना डीजेवाल्याला करण्यात आल्या. एकाच पक्षाचे दोन तुकडे झाले असून, यातील एकाच नेत्याच्या भाषणाची क्लीप काही सेकंदासाठी सुरू झाली आणि उपस्थितांच्या नजरा स्क्रीनवर गेल्या.
Balasaheb Thackeray
Balasaheb Thackerayesakal
Updated on

नाशिकमध्ये विविध विकासकामांसह लोकार्पण सोहळ्यांच्या कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती. राज्याचे प्रमुख नेते उपस्थित होते. पण असे कार्यक्रम म्हटले, की काहीसा उशीर हा ओघाने आलाच. त्यामुळे वेळेवर आलेल्या मंडळींना रोखून ठेवण्याची मोठी कसरत संयोजकांना करावी लागते.

एका उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यास त्या पक्षाच्या गीतांसह नेत्यांच्या भाषणांच्या चित्रफिती दाखविण्याच्या सूचना डीजेवाल्याला करण्यात आल्या. त्यानुसार तो पक्षाचे गीत वाजविण्यासह नेत्यांच्या उपक्रमांच्या चित्रफिती एलइडी स्क्रीनवर दाखवू लागला. दरम्यान, एकाच पक्षाचे दोन तुकडे झाले असून, यातील एकाच नेत्याच्या भाषणाची क्लीप काही सेकंदासाठी सुरू झाली आणि उपस्थितांच्या नजरा स्क्रीनवर गेल्या.

नशीब स्क्रीनवर चित्रफीत दिसली नाही. डीजेवाल्याच्या लक्षात येताच, त्याने काही सेकंदच बंद करीत प्रसंगावधान राखून दुसरी चित्रफीत सुरू केली. परंतु चाणाक्ष उपस्थितांनी काही सेकंदासाठीचा का होईना त्यांच्या कानावर पडलेला ‘ठाकरी’ आवाज ओळखला होता. (balasaheb thackeray udyan inauguration)

घे मोबाईल, शांत हो...

कार्यक्रम कितीही चांगला असू द्या... मोठ्यांच्या कार्यक्रमांना लहान मुले ही कंटाळतातच. गंगापूर रोड येथील सभागृहात ‘दिलखुलास गप्पा’ ऐकण्यासाठी आई आपल्या चिमुकल्‍या लेकीला घेऊन आली. मुलगी आल्या-आल्या बडबड करायला लागल्याने आजूबाजूच्या श्रोत्यांनी तिरकी नजर केली.

लेकीला शांत करण्यासाठी आईला नाइलाजास्तव लेकीच्या हातात मोबाईल द्यावा लागला. लेक एका कोपऱ्यात मोबाईलवर कार्टून बघत बसली आणि आई मुलाखत. मुलांना शांत करण्याचा एकच पर्याय मोबाईल... आई-लेकीचा हा प्रसंग प्रेक्षक मात्र बघतच राहिले.

‘ओपीडी’ आज बंद

शाळेत खोडकर विद्यार्थ्यांच्या तक्रारी पालकांसाठी काही नावीन नाहीत. पण एखाद्या शाळेतील शिक्षिकेविषयी विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या, तर त्याची गावभर चर्चा ही होणारच. झाले असे, की एका शिक्षिकेने मुलींना अभ्यासावरून छड्या दिल्या. या मुलींनी थेट त्यांच्या आई-वडिलांकडे शिक्षिकेची तक्रार केली. पालकही धावत-पळतच शाळेत आले आणि संबंधित शिक्षिकेला जाब विचारू लागले.

एक-दोन दिवस हा सिलसिला सुरू होता. सोमवारपासून सुरू झालेली ही ‘ओपीडी’ शुक्रवारपर्यंत सुरूच राहिली. रोज नवीन पालक यायचे आणि आपले म्हणणे मांडायचे. एक दिवस कुठलेच पालक आले नाही म्हणून शाळेतील दुसऱ्या शिक्षकांनीच या बाईंना विचारले, आज ‘ओपीडी’ बंद आहे वाटतं. आपण डॉक्टर झाल्यासारखं त्यांना वाटू लागले, तर नसेल ना? (latest marathi news)

Balasaheb Thackeray
नारोशंकराची घंटा : हौशी मामाचा चुकलेला कोट

स्‍टेजची कॅपिसिटी संपली

विधानसभा निवडणुकांचे पडघम आता वाजू लागल्‍याने विकासकामांचा नारळदेखील जोमात फुटत आहेत. नेत्‍यांमध्ये उत्‍साह आहे; पण कार्यकर्तेही किती उत्‍साही आहेत, याचा प्रत्यय नुकताच झालेल्‍या कार्यक्रमात आला. झाले असे, की ‘मुख्य’ अतिथी कार्यक्रमस्‍थळी दाखल होणार होते. त्‍यांच्‍यासह इतर सर्वच मान्‍यवरांची प्रतीक्षा प्रेक्षक करत होते. कार्यकर्त्यांनी व्‍यासपीठ गच्च भरलेले होते.

‘मुख्य’ अतिथी काही मिनिटांतच पोहोचणार असल्‍याची सूचना मिळाल्‍यानंतर सुरक्षिततेच्‍या कारणामुळे व्‍यासपीठ रिक्‍त करणे गरजेचे होते. मानपानाचा प्रश्‍न असल्‍याने ‘खाली उतर’ असे कुणाला म्हणावे, असा प्रश्‍न सूत्रसंचालकाला पडला. मग काय त्‍याने शक्‍कल लढवली अन्‌ घोषणा केली ‘स्‍टेजची कॅपिसिटी संपली आहे. कृपया सर्वांनी स्‍टेज रिकामा करावा.’ तरीदेखील धीट कार्यकर्ते खाली उतरण्यास तयार नव्‍हते, मग काय थेट ढकलाढकलीच सुरू झाली.

Balasaheb Thackeray
नारोशंकराची घंटा : दुप्पट भाड्याची मात्रा लागू पडली...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.