विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अन् उमेदवारीबाबतची खमंग चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. चौकाचौकांचे गप्पांचे फड रंगतायत. इंदिरानगरमधील चौकात अशीच चर्चा सुरू होती. फिरण्यासाठी आलेले ज्येष्ठ नागरिक आपापले मत मांडत होते.
एक जण दुसऱ्याला म्हणाले, तुम्ही तर म्हणत होते की, ‘त्यांच्या’बद्दल नाराजी असून, पक्षातून सारेच तक्रारी करताहेत. तरी कशी काय संधी? यावर प्रत्युत्तर आले, की वरिष्ठ पातळीवर त्यांचे ‘वजन’ जास्त भरले असेल. क्षणात पहिले गृहस्थ उत्तरले, अहो जाऊ द्या, बाकी काही नाही ‘एक नारी सब पे भारी’ अन् उपस्थितांमध्ये हशा पिकला. (seema hirey candidacy)