सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान होणाऱ्या भाषणांत वक्त्यांना वेळेचे भान राहत नाही, याची अनेक उदाहरणे ऐकायला, अनुभवायला येतात. लांबलेले भाषण थांबविण्यासाठी वक्त्यांना चिठ्ठी दिली जाते. तरीही काही धीट वक्ते माइक सोडत नाहीत. एका सभागृहामध्ये पार पडलेल्या अशाच कार्यक्रमादरम्यान वक्त्याचे भाषण प्रचंड लांबल्याने श्रोते अन् आयोजक वैतागले. तरीही वक्ते काही माइकचा ताबा सोडेना. मग चिठ्ठ्यांचा सिलसिला सुरू झाला.
अखेरचा चिठ्ठीबॉम्ब असा टाकला की वक्त्यांना भाषण आटोपते घ्यावे लागले. ‘अजून काही वक्त्यांना बोलायचं आहे आणि अर्ध्या तासाने हॉल ताब्यात द्यायचा आहे. वेळेत हॉल दिला नाहीतर दुप्पट भाडं लागेल,’ असा धमकी वजा संदेश चिठ्ठीत लिहिल्याने वक्त्याने भाषणाला पूर्णविराम दिला. टाळ्यांचा गडगडाट करत अन् मिश्कीलपणे हसत श्रोत्यांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. (sakal special naroshankarachi ghanta)