नारोशंकराची घंटा : ‘ये मिल्क और ये बटर’

Latest Nashik News : मॅनेजर आला, त्याने ग्राहकाची समजूत काढायचा प्रयत्‍न केला. प्रकरण मिटल्‍यानंतर सगळ्यांनी वेटरच्या समयसूचकता, भोळेपणाला दाद देताना मनसोक्त हसले.
Butter and Milk
Butter and Milkesakal
Updated on

नाशिकजवळील साधारण हॉटेलमध्ये ग्रामीण भागातील तरुण वेटर कामाला लागलेला. मालक व्यवस्थापकाने त्याला ग्राहक दैवत कोणी असो त्याला चांगली तत्पर सेवा देणे आपले काम, एखादी वस्तू नसली तर बाहेरून मागवायची पण ग्राहक नाराज होता कामा नये, असे बजावून सांगितले. एखादा मेन्यू न समजल्‍यास जुन्या जाणत्याला विचारायचे, हे बोल मात्र वेटर विसरला.

दोन-एक दिवसांनी ग्राहकाने वेटरला बटर मिल्क सांगितले. सकाळच्‍या वेळी हॉटेलमध्ये दूधही नव्हते, बटर वेटरला ठावूकच नव्हते. त्‍याने नजीकच्या डेअरीतून दूध व बेकरीचे बटर (वर्की-पाव) आणले. दूध गरम करून त्यात दोन पाव टाकून, प्लेटमध्ये दोन बटर ठेवत ग्राहकाला सादर केले. ग्राहकाने बटर मिल्क पाहून डोक्याला हात लावला.

‘ये क्या बटर मिल्क है क्या’ असा सवाल केला. ‘ये मिल्क और ये बटर’ असे वेटर उत्तरला. संतप्त ग्राहकाने ‘अभी मॅनेजर को बुलाव’ असे फर्मान सोडले. मॅनेजर आला, त्याने ग्राहकाची समजूत काढायचा प्रयत्‍न केला. प्रकरण मिटल्‍यानंतर सगळ्यांनी वेटरच्या समयसूचकता, भोळेपणाला दाद देताना मनसोक्त हसले. (waiter mistake butter milk)

‘भाऊ’ मला पैसे मिळतील ना!

सध्या लाडक्या बहिणींची बॅंका, टपाला कार्यालये यात मोठी गर्दी आहे. सरकार देत असलेल्या पैशांसाठी अर्जही परिपूर्ण असणे गरजेचे आहे अन्यथा तो नाकारला जातो किंवा थांबविला जात आहे. अशोकनगरच्या टपाल कार्यालयात आलेली अशीच एक महिला काकुळतीने विचारत होती. मी तर सर्व अर्ज व्यवस्थित भरला आहे, माझे पैसे अजून का आलेले नाहीत.

काही त्रुटी असतील, असे संबंधितांने सांगितल्यावर ती नाइलाजाने परतू लागली, तेव्हा पुन्हा दरवाजात एकाला विचारले, माझे खाते सुरू आहे, नंबरही लिंक आहे मग त्रुटी काय असेल, भाऊ. त्यावर त्याने मावशी बॅंक खात्याला जो मोबाईल नंबर असेल तोच आधारला लिंक हवा तरच रक्कम तुम्हाला मिळेल, असे सांगितले.

त्यावर आता आधारला लिंक आहे की नाही हे तपासण्यासाठी सातपूरला आधार केंद्रावर जा, असे त्यांना समजून सांगितले, तरीही पुन्हा भाऊ त्यानंतर तरी पैसे मिळतील ना, असे तिने पुन्हा विचारल्यावर रांगेत उभ्या असलेल्या बायकांचा एकमुखी सूर उमटला... मिळायलाच पाहिजे...

चुकलेल्‍या अर्जावर दसऱ्यानंतर निर्णय

शासकीय काम अन्‌ सहा महिने थांब... हे सर्वश्रुत आहे. पण त्याच्या उलट घडले तर निश्‍चितच आश्‍चर्याचा धक्का बसेल ना. हो, अगदी तसेच घडले. शाळा, महाविद्यालयीन शिक्षण सोडून बरीच वर्षे झालेला व्यक्ती ‘डुप्लिकेट’ दाखला काढण्यासाठी जाते. तिथे तिला भलीमोठी कागदपत्रांची लिस्ट दाखविली जाते.

एक-एक कागदपत्र जमा करताना घाम फुटतो. घामाघूम अवस्थेत भाऊ पोलिस ठाण्यात जातो. त्यांच्याकडून एनओसी हवी असते. पण, सगळे पोलिस नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्ताला गेलेले. आता काय करायचे म्हणून तेथील ‘लेडी पीएसआय’ स्वत: हे काम हाती घेतात. संबंधित व्यक्तीला त्याच्या अर्जावर सही व शिक्का मारून मिळतो.

त्या आनंदात भाऊ थेट महाविद्यालयात पोहोचतात अन्‌ अर्ज जमाही करतात. तोपर्यंत पोलिस ठाण्यातून चार फोन येऊन जातात, तुमचा अर्ज चुकला आहे. पण आपण तर अर्ज जमाही केला, आता काय करायचे, असे म्हणत त्याने आता दसऱ्यानंतर बघू, असे सांगत वेळ मारून नेली.

(latest marathi news)

Butter and Milk
नारोशंकराची घंटा : दुप्पट भाड्याची मात्रा लागू पडली...

काही नाटके झाल्याने ते रखडले

एका लोकप्रतिनिधींनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना विकासकामांचा लेखाजोखा मांडला. चर्चेत विषय निघाला नाट्यगृहाचा. विस्‍तारित शहरात नाट्यगृह होऊ शकलेले नाही, असा प्रश्‍नाचा सूर होता. यावर आधी अपेक्षेप्रमाणे उत्तर आले, की जागेचा शोध घेतला, पण ती मिळविण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर अनेक अडचणी आल्या.

काही ठिकाणी मुद्दाम अडचणी निर्माण केल्‍या गेल्‍याने नाट्यगृह होऊ शकले नाही. उत्तराचा उत्तरार्थदेखील रंजकच होता. आपल्या भागात अनेक नाटके चालतात, त्यातील काही नाटके झाल्याने ती होऊ शकले नाहीत, अशी पुष्टी जोडली अन्‌ एकच हशा पिकला.

व्‍हीआयपींनाच मिळतो मान

एका दालनाच्‍या प्रारंभानिमित्त सेलिब्रिटी म्‍हणून ‘धकधक गर्ल’ उपस्‍थित होती. कुठलेही सेलिब्रिटी येणार म्हटल्‍यावर चाहत्‍यांची गर्दी होणे स्‍वाभाविकच आहे. त्‍यात ‘धकधक गर्ल’चे चाहते मोठे आहेत. दालनाबाहेर तोबा गर्दी झाली होती. गर्दी नियंत्रणासाठी तेथे तैनात पोलिस कर्मचारी अतोनात प्रयत्‍न करत होते. त्‍यातच तेथे नेमलेले ‘बाउन्‍सर’ हे चाहत्‍यांना भलतेच ‘आदरा’ने वागणूक देत होते.

नाराज चाहते बाजूला उभे राहून गंमत बघत होते. इतक्‍यात दालनात काही व्‍हीआयपी ग्राहक आले. त्‍यांना वाट करून देणे बाउन्‍सरला क्रमप्राप्त होते. त्‍यानुसार त्‍याने जागा करत असताना, चाहत्‍यांकडे नजर फिरविली अन्‌ प्रवेश नाकारणाऱ्या चाहत्‍यांच्‍या चेहऱ्यावरील मिश्‍कील हास्‍य पाहून तो कानपटला अन्‌ चाहत्‍यांनी त्‍याचा हिरमुसलेला चेहरा पाहून हास्‍यफवारे उडविले.

थोडक्‍यात बोलणेच बरे

‘सेवा’कार्यातील एका संस्‍थेचा वर्धापन दिन झाला. भलेमोठे पाहुणे व्‍यासपीठावर आसनस्‍थ झाले अन्‌ कार्यक्रमाला सुरुवात झाली. आता कुठलाही कार्यक्रम म्‍हटला की वेळ अन्‌ श्रोत्‍यांची सहनशक्‍ती या दोन्‍हींना मर्यादा असते. पण ही गोष्ट काही जण विसरतात. झालेही तसेच, प्रास्‍ताविकात संस्‍थेचे कार्य मांडणीला सुरुवात झाली.

सादरीकरणातून सर्व बारकावे समजावताना, वेळेचे भान मात्र संबंधितांना राहिले नाही अन्‌ कार्यक्रमाला आधीच भरपूर उशीर झाला. पुढे दोन वक्‍ते आणि अध्यक्षांचे भाषण व्‍हायचे होते. लांबलेले प्रास्‍ताविक आटोपल्‍यानंतर पुढील दोन वक्‍त्‍यांनी अवघ्या काही मिनिटांमध्ये भाषण आवरले. ‘थोडक्‍यात बोलणेच बरे’ हे कदाचित त्‍यांना श्रोत्‍यांचे चेहरे वाचून लक्षात आले असावे.

Butter and Milk
नारोशंकराची घंटा : ...अन् ‘ठाकरी’ आवाज आला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.