SAKAL Special : न्याय, स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांची अवहेलना करणाऱ्या मनुस्मृतीमधील काही संदर्भ आगामी अभ्यासक्रमात वापरण्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रास्ताविक केले होते. परंतु सर्व स्तरातून यावर कडाडून विरोध झाल्याने शिक्षण विभागाला बॅकफूटवर यावे लागले आहे. आगामी अभ्यासक्रमातून ‘मनुस्मृती’चा संदर्भ काढून टाकण्यात येणार असल्याने शिक्षणप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने तयार केलेल्या अभ्यासक्रम आराखड्यावर सुमारे तीन हजार ९०० हरकती, सूचना दाखल झाल्या आहेत. (NCERT decision to expel reference to Manusmriti from syllabus )
या हरकती/सूचना विचारात घेऊन अभ्यासक्रम आराखडा अंतिम करण्यात येत आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘एससीईआरटी’ने तिसरी ते बारावीसाठी अभ्यासक्रम आराखडा तयार करून जाहीर केला. नव्या धोरणात देशातील पारंपरिक, प्राचीन ज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी भारतीय ज्ञानप्रणाली या घटकाचा समावेश करण्यात आला आहे.
त्या अनुषंगाने राज्यासाठीच्या आराखड्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयांचे शिक्षण, शाखानिहाय शिक्षणाची पद्धती मोडीत काढणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला, शारीरिक शिक्षणाचे अध्यापन अशा विविध तरतुदींसह प्रत्येक विषयांच्या अभ्यासक्रमांत भारतीय ज्ञानप्रणालीवर आधारित घटकांचा समावेश करण्याचे प्रस्तावित करण्यात आले. त्यात भाषा विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेच्या अध्यायाचे पाठांतर, विद्यार्थ्यांना भगवद्गीतेतील ज्ञानयोग, आत्मज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग यांची ओळख करून देण्याबाबत सुचविण्यात आले होते. (latest marathi news)
त्याशिवाय या आराखड्यात ‘मनुस्मृती’तील श्लोकाचा संदर्भ देण्यात आल्याने हा आराखडा वादात सापडला होता. या वादाला राजकीय वळणही आले होते. या विरोधात आंदोलनेही झाली होती, तसेच आराखड्यातील धार्मिक शिक्षणाचा आग्रह, ‘मनुस्मृती’चा उल्लेख यांसह विविध तरतुदींवर आक्षेप घेण्यात आले होते. अभ्यासक्रम आराखडा जाहीर करताना या अभ्यासक्रम आराखड्यावर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक अशा विविध घटकांकडून हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या.
''अभ्यासक्रम आराखड्यावर सुमारे तीन हजार ९०० हरकती, सूचना प्राप्त झाल्या आहेत. प्रत्येक हरकत, सूचना विचारात घेऊन अभ्यासक्रम आराखडा अंतिम करण्यात येत आहे. आराखडा अंतिम करून तो सुकाणू समितीला सादर केला जाणार आहे. अभ्यासक्रमातून ‘मनुस्मृती’चा संदर्भ काढून टाकला जाणार आहे.''- राहुल रेखावार, संचालक एससीईआरटी
''मनुस्मृतीमध्ये अस्पृश्य, शूद्र व स्त्रियांबद्दल अन्यायकारक काही कायदे, श्लोकसुद्धा आहेत. मानवी मूल्यांचे अवमूल्यन करणाऱ्या या ग्रंथामुळे जातिव्यवस्था, अस्पृश्यता, जातिबंधने अधिक बळकट झालेली होती. त्यामुळे महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ ला सर्वप्रथम ‘मनुस्मृती’ ग्रंथाचे जाहीरपणे दहन केले आहे. ‘एससीईआरटी’च्या निर्णयाचे स्वागत आहे.''- अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.