SAKAL Vidya Expo 2024 : चांगलं करिअर घडवायची मोठी संधी! ‘सकाळ विद्या एक्‍स्‍पो 2024’ शैक्षणिक प्रदर्शनाचे आज उद्‌घाटन

Nashik News : ‘सकाळ विद्या एक्‍स्‍पो २०२४’ शैक्षणिक प्रदर्शन आयोजित केले आहे. चांगले करिअर घडविण्यासाठी विद्यार्थी, पालकांनी या प्रदर्शनास नक्‍की भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Sakal Vidya logo
Sakal Vidya logoESAKAL
Updated on

Nashik News : दहावी, बारावीचे निकाल जाहीर झालेले असून, करिअरचा पर्याय निवडण्याची हीच खरी वेळ आहे. विद्यार्थी, पालकांना करिअरच्‍या सर्वसमावेशक पर्यायांची माहिती व्‍हावी, तसेच यथोचित मार्गदर्शन मिळावे, यासाठी ‘सकाळ विद्या एक्‍स्‍पो २०२४’ शैक्षणिक प्रदर्शन आयोजित केले आहे. चांगले करिअर घडविण्यासाठी विद्यार्थी, पालकांनी या प्रदर्शनास नक्‍की भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (Sakal Vidya Expo 2024)

सिटी सेंटर मॉलसमोरील लक्षिका सभागृहातील या प्रदर्शनाचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. १४) होणार असून, रविवार (ता. १६)पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील. ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘सकाळ विद्या एक्‍स्पो २०२४’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्‌घाटन शुक्रवारी दुपारी साडेबाराला होणार आहे. या कार्यक्रमास पोलिस आयुक्‍त संदीप कर्णिक, बांधकाम व्‍यावसायिक दीपक चंदे.

युनियन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रमुख प्रभात कुमार, मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, ब्रह्मा व्‍हॅली ग्रुप ऑफ इन्‍स्‍टिट्यूटचे प्रमुख राजाराम पानगव्‍हाणे-पाटील, के. के. वाघ शिक्षण संस्‍थेचे जनसंपर्क विश्‍वस्‍त अजिंक्‍य वाघ, कल्‍याणी चॅरिटेबल ट्रस्‍ट.

सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ, फिजिक्‍सवाला विद्यापीठाचे सेंटर हेड यश द्विवेदी यांच्‍यासह इतर मान्‍यवर उपस्‍थित राहणार आहेत. इयत्ता दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले असताना, सीईटी परीक्षांचे निकालही जाहीर होत आहेत. या पार्श्वभूमीवर सध्याचा कालावधी अभ्यासक्रमाची निवड करण्याच्‍या दृष्टीने विद्यार्थी, पालकांसाठी अत्‍यंत महत्त्वाचा आहे.

या पार्श्वभूमीवर ‘सकाळ विद्या एक्‍स्‍पो २०२४’ शैक्षणिक प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात विद्यार्थी, पालकांच्‍या शंकांचे निरसन केले जाणार असून, त्‍यांना पर्याय निवडीसाठी यथोचित मार्गदर्शनही उपलब्‍ध असेल. या प्रदर्शनात विविध नामांकित संस्‍थांच्या स्‍टॉल्सचा सहभाग असल्‍याने प्रत्‍येक शैक्षणिक संकुलाला भेट देताना दमछाक करण्याची आवश्‍यकता विद्यार्थी, पालकांना नसेल.

Sakal Vidya logo
Sakal Vidya Education Expo : ‘सकाळ एज्युकेशन एक्स्पो’ करिअर घडविण्यासाठी उपयुक्त

व एकाच छताखाली सर्वसमावेशक करिअरचे पर्याय उपलब्‍ध होतील. विद्यार्थी पालकांना माहिती देणे, समुपदेशन सुविधा उपलब्‍ध असणार आहे. त्‍यामुळे गोंधळून न जाता अभ्यासक्रमाची निवड करण्यापूर्वी विद्यार्थी आणि पालकांनी या प्रदर्शनाला एकदा भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

मार्गदर्शन सत्रांतून करा शंकांचे निरसन

या प्रदर्शनानिमित्त मार्गदर्शन सत्रांचेही आयोजन केले आहे. यात विद्यार्थी, पालकांना त्‍यांच्‍या शंकांचे निरसन करून घेता येईल. त्‍यामुळे विद्यार्थ्यांना प्रदर्शनाचा दुहेरी लाभ होणार आहे.

‘सैन्‍यात करिअर’बाबत रविवारी आहेरराव यांचे व्‍याख्यान

सैन्‍यदलात नोकरी करताना देशसेवेची संधी युवकांना उपलब्‍ध असते. सैन्‍यदलात करिअरचे भरपूर पर्याय उपलब्‍ध असून, याविषयीची माहिती देण्यासाठी सुदर्शन अॅकॅडमीचे संचालक हर्षल आहेरराव यांचे व्‍याख्यान आयोजित केले आहे. रविवारी (ता. १६) दुपारी चारला होत असलेल्‍या या व्‍याख्यानात प्रामुख्याने ‘तयारी एनडीए आणि एसपीआयची’ याविषयी मार्गदर्शन केले जाईल.

नुकताच जाहीर झालेल्‍या ‘एसपीआय’च्‍या निकालात सुदर्शन अॅकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने निवडले गेले असून, यानिमित्त ‘एसपीआय’मध्ये प्रवेशासाठी इच्‍छुक विद्यार्थ्यांना उपयुक्‍त मार्गदर्शन या चर्चासत्रातून मिळणार आहे.

Sakal Vidya logo
SAKAL Vidya Expo 2024 : जाणून घ्या, करिअरच्‍या उत्तम संधी..! ‘सकाळ विद्या एक्‍स्‍पो 2024’ प्रदर्शन 14 जूनपासून

‘सकाळ विद्या एक्‍स्‍पो’बाबत...

कधी- १४ ते १६ जून २०२४

वेळ- सकाळी १० ते रात्री ८ दरम्‍यान

कुठे- लक्षिका सभागृह, सिटी सेंटर मॉलसमोर, उंटवाडी, नाशिक

काय आहे सकाळ विद्या एक्‍स्‍पो प्रदर्शनात..?

- नामांकित शैक्षणिक संस्‍थांचे स्‍टॉल्‍स

- करिअरविषयी मार्गदर्शन चर्चासत्रे

- चर्चेतून वैयक्‍तिक स्वरूपातील मार्गदर्शन

- करिअर कौन्‍सिलिंगची सुविधा

- विद्यार्थी संवादातून विचारांचे आदानप्रदान

- नेटवर्किंगची असेल संधी

यांचा असेल प्रदर्शनात सहभाग...

‘सकाळ विद्या एक्‍स्‍पो २०२४’ या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍था (मविप्र संस्‍था) हे आहेत. पॉवर्ड बाय के. के. वाघ शिक्षण संस्‍था आयोजित प्रदर्शनासाठी सह-प्रायोजक पीडब्‍ल्‍यू विद्यापीठ फिजिक्‍सवाला, तर प्रायोजकांमध्ये अशोका बिझनेस स्‍कूल आणि ब्रह्मा व्‍हॅली एज्‍युकेशन कॅम्‍पस यांचा समावेश आहे.

प्रदर्शनात मविप्र संस्‍था, धन्‍वंतरी इन्‍स्‍टिट्यूट ऑफ डिझाइन ॲण्ड टेक्‍नॉलॉजी (डीआयडीटी), सपकाळ नॉलेज हब, आकाश इन्‍स्‍टिट्यूट, अशोका बिझनेस स्‍कूल, के. के. वाघ शिक्षण संस्‍था, गुरू गोविंदसिंग फाउंडेशन, पीडब्‍ल्‍यू विद्यापीठ फिजिक्‍सवाला, ब्रह्मा व्‍हॅली, सुदर्शन अॅकॅडमी एनडीए-एसपीआय, तोतलेज्‌ कॉमर्स अॅकॅडमी, युनियन बँक ऑफ इंडिया, एमबी पाटील एज्‍युकेशन इन्‍स्‍टिट्यूट.

Sakal Vidya logo
'SAKAL Vidya Expo 2024 : ‘सकाळ विद्या एक्‍स्‍पो 2024’चे दालन शुक्रवारपासून होणार खुले!

उका तरसाडिया युनिव्‍हर्सिटी यांचा सहभाग असेल. प्रदर्शनासाठी गिफ्ट पार्टनर सोनी गिफ्ट्‌स प्रा. लि., इव्‍हेंट पार्टनर स्‍पायडर मीडिया हाउस, डिजिटल पार्टनर गुरू पब्‍लिसिटी, आउटडोअर पार्टनर इशा पब्‍लिसिटी, नर्सरी पार्टनर पपया नर्सरी, बँकिंग पार्टनर युनियन बँक ऑफ इंडिया हे आहेत.

गुणवंतांच्‍या पाठीवर कौतुकाची थाप

‘सकाळ विद्या एक्स्पो’निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांच्‍या पाठीवर कौतुकाची थाप दिली जाणार आहे. त्‍यासाठी इयत्ता दहावी- बारावीच्‍या परीक्षेत ७५ टक्क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मान केला जाणार आहे. १५ व १६ जूनला हा सत्‍कार केला जाणार असून, स्‍तुत्‍य उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन करण्यात आले.

विविध शैक्षणिक संस्थांमधील दहावी, बारावीच्या ७५ टक्क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना अवश्य पाठवून शैक्षणिक क्षेत्रातील विविध पर्यायांबाबत माहिती, सत्कार समारंभ व प्रशस्तीपत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Sakal Vidya logo
Nashik News : शालाबाह्य मुलांना प्रवाहात आणा; शिक्षणाधिकारी पाटील यांचे महापालिका शिक्षकांना आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.