SAKAL Vidya Education Expo : ‘सकाळ विद्या एक्‍स्‍पो’मध्ये पालक- विद्यार्थ्यांची गर्दी; पोलिस आयुक्‍त कर्णिक यांच्‍या हस्‍ते उद्‌घाटन

Nashik News : ‘सकाळ विद्या एक्‍स्‍पो २०२४’ शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्‌घाटन शुक्रवारी पोलिस आयुक्‍त संदीप कर्णिक यांच्‍या हस्‍ते झाले.
While inaugurating the educational exhibition Sakal Vidya Expo 2024, Commissioner of Police Sandeep Karnik, General Secretary of MVPS Education Institute Adv. Nitin Thackeray
While inaugurating the educational exhibition Sakal Vidya Expo 2024, Commissioner of Police Sandeep Karnik, General Secretary of MVPS Education Institute Adv. Nitin Thackerayesakal
Updated on

Nashik News : विविध क्षेत्रांतील करिअरच्‍या संधींची माहिती एका छताखाली उपलब्‍ध करून देणाऱ्या ‘सकाळ विद्या एक्‍स्‍पो २०२४’ शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. १४) पोलिस आयुक्‍त संदीप कर्णिक यांच्‍या हस्‍ते झाले. सिटी सेंटर मॉलसमोरील लक्षिका सभागृहात भरविलेल्‍या या प्रदर्शनाच्‍या उद्‌घाटन कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्‍यवरांनी हजेरी लावत शुभेच्‍छा दिल्‍या. ( Sakal Vidya Expo 2024 educational exhibition was inaugurated by Police Commissioner Sandeep Karnik)

तत्‍पूर्वी, सकाळपासून प्रदर्शनाला पालक व विद्यार्थ्यांनी भेट देत गर्दी केली होती. रविवार (ता. १६)पर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. दहावी, बारावीचे निकाल जाहीर झालेले असताना करिअरचे पर्याय निवडीसाठी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने ‘सकाळ’तर्फे ‘सकाळ विद्या एक्‍स्‍पो २०२४’ प्रदर्शन आयोजित केले आहे.

या प्रदर्शनाच्‍या उद्‌घाटन कार्यक्रमास पोलिस आयुक्‍त संदीप कर्णिक, दीपक बिल्‍डर्स ॲण्ड डेव्‍हलपर्सचे व्‍यवस्‍थापकीय संचालक दीपक चंदे, युनियन बँक ऑफ इंडियाच्‍या नाशिक क्षेत्राचे क्षेत्रीय प्रमुख प्रभातकुमार, मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, के. के. वाघ शिक्षण संस्‍थेचे जनसंपर्क संचालक अजिंक्‍य वाघ, नाशिक ग्रामीण शिक्षणप्रसारक मंडळ संस्‍थेचे सरचिटणीस गौरव पानगव्‍हाणे-पाटील.

डॉ. धनीषा पानगव्‍हाणे-पाटील, गोदावरी शिक्षण मंडळ संस्‍थेचे सचिव अशोक सावंत, ‘नावा’ संघटनेचे अध्यक्ष प्रवीण चांडक, एसआर केटरर्सचे संदीप सोनार, विद्यापीठ पॉवर्ड बाय फिजिक्‍सवाला या संस्‍थेचे शुभेंद्र मिश्रा आदी मान्‍यवर उपस्‍थित होते. (latest marathi news)

While inaugurating the educational exhibition Sakal Vidya Expo 2024, Commissioner of Police Sandeep Karnik, General Secretary of MVPS Education Institute Adv. Nitin Thackeray
Nashik News : शाळा 2 दिवसांवर; ना कापड, ना मापे! शिक्षक संघटनांची नाराजी

‘सकाळ विद्या एक्‍स्‍पो २०२४’ या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍था हे आहेत. पॉवर्ड बाय के. के. वाघ शिक्षण संस्‍था आयोजित प्रदर्शनासाठी सह-प्रायोजक पीडब्‍ल्‍यू विद्यापीठ फिजिक्‍सवाला, तर प्रायोजकांमध्ये अशोका बिझनेस स्‍कूल आणि ब्रह्मा व्‍हॅली एज्‍युकेशन कॅम्‍पस यांचा समावेश आहे.

‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, मुख्य व्‍यवस्‍थापक (जाहिरात) पंकज पिसोळकर आदींनी मान्यवरांचे स्वागत केले. दरम्‍यान, उद्‌घाटन कार्यक्रमानंतर दिवसभर विद्यार्थी, पालकांची रेलचेल प्रदर्शन स्‍थळी राहिली. सायंकाळच्‍या वेळी गर्दी करताना करिअरच्‍या संधींची माहिती जाणून घेण्याची लगबग पाहायला मिळाली.

पुढील दोन दिवस रविवार (ता. १६)पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असून, अधिकाधिक पालक व विद्यार्थ्यांनी भेट देण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. आदित्‍य तुपे यांनी सूत्रसंचालन केले. वृत्तसंपादक संजय वाघ यांनी आभार मानले. या वेळी ‘नावा’चे माजी अध्यक्ष मोतीराम पिंगळे (पिंगळे पब्लिसिटी), ‘नावा’ सदस्य श्याम पवार, राजेश शेळके, गणेश नाफडे, शैलेश दगडे, डॉ. अभिजित चांदे (मीडिया कन्सल्टंट), जितेंद्र येवले आदी उपस्‍थित होते.

"‘सकाळ’ने आयोजित केलेले ‘सकाळ विद्या एक्‍स्‍पो २०२४’ प्रदर्शन विद्यार्थी, पालकांसाठी निश्‍चित मार्गदर्शक आहे. विविध पर्यायांची सखोल माहिती होण्यासह शंकांचे निरसन होण्यास मदत होणार असल्‍याने अधिकाधिक विद्यार्थी व पालकांनी भेट द्यावी." - संदीप कर्णिक, पोलिस आयुक्‍त

While inaugurating the educational exhibition Sakal Vidya Expo 2024, Commissioner of Police Sandeep Karnik, General Secretary of MVPS Education Institute Adv. Nitin Thackeray
Nashik News : प्रीपेड वीजमीटरला नागरिकांचा विरोध; निर्णय मागे न घेतल्याने विविध पक्षांचा आंदोलनाचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.