SAKAL Vidya Expo 2024 : जाणून घ्या, करिअरच्‍या उत्तम संधी..! ‘सकाळ विद्या एक्‍स्‍पो 2024’ प्रदर्शन 14 जूनपासून

SAKAL Vidya Expo : उत्तम करिअर घडवायचे असेल तर याच टप्प्‍यावर योग्‍य अभ्यासक्रमाची निवड करणे आवश्‍यक ठरते.
Sakal Vidya logo
Sakal Vidya logoESAKAL
Updated on

SAKAL Vidya Expo 2024 : दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाचे वेध लागतात; पण उत्तम करिअर घडवायचे असेल तर याच टप्प्‍यावर योग्‍य अभ्यासक्रमाची निवड करणे आवश्‍यक ठरते. विविध शाखांतील करिअरच्‍या उपलब्‍ध असलेल्‍या संधींची माहिती विद्यार्थी व पालकांना व्‍हावी, या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘सकाळ विद्या एक्‍सपो २०२४’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ( Sakal Vidya Expo 2024 exhibition from 14th June )

१४ ते १६ जूनदरम्‍यान सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत सिटी सेंटर मॉलसमोरील लक्षिका सभागृहातील या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. सध्याच्‍या काळात सर्वच क्षेत्रांत प्रचंड स्‍पर्धा निर्माण झालेली असून, करिअरविषयीची, नवनवीन अभ्यासक्रमांची तसेच प्रवेशप्रक्रियेतील तांत्रिक बाबींची विद्यार्थी व त्‍यांच्‍या पालकांना परिपूर्ण माहिती नसते. ही बाब हेरत ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘सकाळ विद्या एक्‍स्‍पो २०२४’मध्ये एकाच छताखाली विद्यार्थी, पालकांना करिअरच्‍या पर्यायांची माहिती मिळू शकणार आहे.

या प्रदर्शनानिमित्त प्रवेश सवलतीच्‍या योजनांचा लाभही विद्यार्थ्यांना होईल. नामांकित संस्‍थांचा या प्रदर्शनात सहभाग असल्‍याने एकाच ठिकाणी भेट देत विद्यार्थी, पालकांना सर्व पर्यायांची माहिती मिळू शकेल. स्टॉल बुकिंग व अधिक माहितीसाठी मनीष (९५४५५८४९९५), समीर (९४२२७४७५२७) यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ विद्या एक्‍स्‍पोबाबत..

कधी- १४ ते १६ जून २०२४

वेळ- सकाळी १० ते रात्री ८ दरम्‍यान

कुठे- लक्षिका सभागृह, सिटी सेंटर मॉलसमोर, उंटवाडी, नाशिक

काय आहे या प्रदर्शनात..?

- नामांकित शैक्षणिक संस्‍थांचे स्‍टॉल्‍स्

- करिअरविषयी मार्गदर्शन चर्चासत्रे

- चर्चेतून वैयक्‍तिक स्वरूपातील मार्गदर्शन

- करिअर कौन्‍सिलिंगची सुविधा

- विद्यार्थी संवादातून विचाराचे आदानप्रदान

- नेटवर्किंगची असेल संधी

Sakal Vidya logo
JEE Main Result : जेईई मेन्‍समध्ये चमकले नाशिकचे विद्यार्थी; आयुषचा 164 वा क्रमांक

यांचा असेल प्रदर्शनात सहभाग...

‘सकाळ विद्या एक्‍स्‍पो २०२४’ या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍था (मविप्र संस्‍था) हे आहेत. पॉवर्ड बाय के. के. वाघ शिक्षण संस्‍था आयोजित या प्रदर्शनासाठी सह-प्रायोजक पीडब्‍ल्‍यू विद्यापीठ फिजिक्‍सवाला, तर प्रायोजकांमध्ये अशोका बिझनेस स्‍कूल आणि ब्रह्मा व्‍हॅली एज्‍युकेशन कॅम्‍पस यांचा समावेश आहे.

प्रदर्शनात नामांकित शैक्षणिक संस्‍था, खासगी क्‍लासेस, शैक्षणिक कर्जपुरवठा करणाऱ्या बँक आदींचे स्‍टॉल्‍स असतील. अभियांत्रिकी, पॉलिटेक्‍निक यांसह कोटास्थित नामांकित क्लासेस, मान्यताप्राप्त फॅशन व डिझाइन संस्था यांचे विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन मिळेल.

गुणवंतांच्‍या पाठीवर कौतुकाची थाप

‘सकाळ’ विद्या एक्स्पोनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांच्‍या पाठीवर कौतुकाची थाप दिली जाणार आहे. दहावी, बारावीच्‍या परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मान केला जाणार आहे. १५ व १६ जूनला हा सत्‍कार केला जाणार असून, स्‍तुत्‍य उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन केले.

विविध शैक्षणिक संस्थांमधील दहावी, बारावीच्या ७५ टक्क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळळिलेल्या विद्यार्थ्यांना अवश्य पाठवून शैक्षणिक क्षेत्रातील विविध पर्यायांबाबत माहिती सत्कार समारंभ व प्रशस्तिपत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.(latest marathi news)

Sakal Vidya logo
JEE Advanced Result 2024 : जेईई ॲडव्हान्सचा निकाल जाहीर, एका क्लिकवर पाहा रिझल्ट

''करिअरच्‍या संधींविषयी माहिती जाणून घेण्यासाठी विद्यार्थी, पालकांना विविध शैक्षणिक संकुलांना भेट द्यावी लागते. ही दमछाक टाळताना ‘सकाळ’तर्फे एकाच छताखाली अनेक पर्यायांची माहिती उपलब्‍ध केली आहे. विद्यार्थी, पालकांनी प्रदर्शनात उपलब्‍ध सर्व माहितीपत्रके संकलित करून, त्‍यांची योग्‍य चिकित्‍सा करीत करिअरसाठी पर्यायाची निवड करावी. त्‍यासाठी अधिकाधिक विद्यार्थी, पालकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी.''- ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र संस्‍था

''करिअरचा मार्ग निवड करण्यासाठी प्रदर्शन म्‍हणजे प्रवेशद्वार ठरणार आहे. या ठिकाणी माहिती प्राप्त करून घेतल्‍यावर विद्यार्थी, पालकांना विविध बाबींची तुलना करणे सोपे होईल. इतर कुणाच्‍या सांगण्यावरून एखाद्या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांची आवड, आकलन शक्‍तीनुसार अभ्यासक्रमाची निवड करावी. दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले असून, योग्‍य वेळी ‘सकाळ’तर्फे प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनामुळे विद्यार्थी, पालकांना करिअरच्‍या मार्ग निवडीसाठी सहाय्यता होईल.''- प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर, के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय

''दहावी, बारावीनंतर अभ्यासक्रमाची निवड करणे करिअरच्‍या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय असतो. त्‍यामुळे सर्व पर्यायांची माहिती जाणून घेतल्‍यावर शंकांचे समाधान करून घेत मगच अंतिम निवड करावी. अभ्यासक्रमाबरोबर शैक्षणिक संस्‍थेची निवड हीसुद्धा महत्त्वाची असते. पर्यायांची माहिती विद्यार्थी व पालकांना व्‍हावी, या उद्देशाने ‘सकाळ’तर्फे आयोजित हे प्रदर्शन मार्गदर्शक ठरेल. अधिकाधिक विद्यार्थी, पालकांनी प्रदर्शनाला भेट देताना माहिती जाणून घ्यावी.''- डॉ. नरेंद्र तेलरांधे, प्रशासक, अशोका एज्‍युकेशन फाउंडेशन

Sakal Vidya logo
Nashik Rain Damage : वादळी वाऱ्याने द्राक्षनगरीत दाणादाण; 22 तासानंतर वीजपुरवठा सुरळीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com