SAKAL Vidya Expo 2024 : गुणवंतांचा सन्मान अन्‌ करिअरला दिशा; आज अखेरची संधी

Nashik News : सिटी सेंटर मॉलसमोरील लक्षिका सभागृहात भरविण्यात आलेल्‍या ‘सकाळ विद्या एक्‍स्‍पो २०२४’ला दोन दिवसांपासून विद्यार्थी, पालकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
Nashik Students registering for the exhibition.
Nashik Students registering for the exhibition.esakla
Updated on

Nashik News : सिटी सेंटर मॉलसमोरील लक्षिका सभागृहात भरविण्यात आलेल्‍या ‘सकाळ विद्या एक्‍स्‍पो २०२४’ला दोन दिवसांपासून विद्यार्थी, पालकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या तीनदिवसीय शैक्षणिक प्रदर्शनाचा रविवारी (ता. १६) शेवटचा दिवस असून, सकाळी दहा ते रात्री आठ या दरम्‍यान प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल. (SAKAL Vidya Expo 2024)

त्‍यामुळे चांगला करिअरचा मार्ग निवडण्याच्‍या दृष्टीने प्रदर्शनाला भेट देत मार्गदर्शन मिळविण्याची ही शेवटची संधी असणार आहे. शहरासह जिल्‍हास्‍तरावरील नामांकित शैक्षणिक संस्‍था, क्‍लासेसचा सहभाग असल्‍याने विद्यार्थी, पालकांना एकाच छताखाली विविध अभ्यासक्रमांची माहिती उपलब्‍ध झाली आहे.

या प्रदर्शनात भेट देणाऱ्या विद्यार्थी, पालकांना संस्‍थांचे प्रतिनिधी सर्वसमावेशक माहिती देत आहेत. त्‍यांच्‍या शंकांचे निरसन करताना प्रवेशप्रक्रियेतील महत्त्वाच्‍या बाबींची माहितीही त्‍यांच्‍यापर्यंत पोहोचवत आहेत. त्‍यामुळे करिअर, अभ्यासक्रम निवडीच्‍या दृष्टिकोनातून प्रदर्शनाचा फायदा झाला असल्‍याची प्रतिक्रिया अनेक विद्यार्थी व पालकांनी दिलेली आहे.

‘सकाळ विद्या एक्‍स्‍पो २०२४’ प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍था (मविप्र) आहे. पॉवर्ड बाय के. के. वाघ शिक्षण संस्‍था आयोजित प्रदर्शनासाठी सहप्रायोजक पीडब्‍ल्‍यू विद्यापीठ फिजिक्‍सवाला, तर प्रायोजकांमध्ये अशोका बिझनेस स्‍कूल आणि ब्रह्मा व्‍हॅली एज्‍युकेशन कॅम्‍पस यांचा समावेश आहे. (latest marathi news)

Nashik Students registering for the exhibition.
Sakal Vidya Education Expo : ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’त मोफत प्रवेश

दहावी, बारावीच्‍या ७५ टक्क्‍यांवरील गुणवंतांचा आज भेटवस्‍तूने सन्‍मान

दहावी, बारावीच्‍या परीक्षेत ७५ टक्क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्‍या विद्यार्थ्यांचा सत्‍कार प्रदर्शनस्‍थळी केला जात आहे. शनिवारी (ता. १५) मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालकांनी उपस्‍थित राहून सन्मान स्‍वीकारला. दरम्‍यान, उर्वरित विद्यार्थ्यांना रविवारी (ता. १६) दिवसभरात प्रदर्शनाला भेट देत सत्‍कार स्‍वीकारता येईल. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते भेटवस्‍तू व प्रमाणपत्र देऊन हा सत्‍कार केला जाणार असून, विद्यार्थ्यांनी उपस्‍थित राहून सत्‍कार स्‍वीकारण्याचे आवाहन केले आहे.

‘सीईओ’ मित्तल देणार प्रदर्शनाला भेट

या प्रदर्शनाला विविध क्षेत्रांतील मान्‍यवर भेट देत आहेत. रविवारी सकाळी अकराला जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल या प्रदर्शनाला भेट देत स्‍टॉल्‍सची पाहणी करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करणार आहेत. २०१८ बॅचच्‍या सनदी अधिकारी असलेल्‍या आशिमा मित्तल यांनी जिल्‍हा परिषदेच्‍या माध्यमातून ‘सुपर ५०’ हा विद्यार्थ्यांच्‍या दृष्टीने अभिनव उपक्रम राबविला आहे. त्‍यामुळे विद्यार्थ्यांना त्‍यांचे मार्गदर्शन उपयुक्‍त ठरेल.

Nashik Students registering for the exhibition.
SAKAL Vidya Education Expo : ‘सकाळ विद्या एक्‍स्‍पो’मध्ये पालक- विद्यार्थ्यांची गर्दी; पोलिस आयुक्‍त कर्णिक यांच्‍या हस्‍ते उद्‌घाटन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.