Nashik News : महाराष्ट्र राज्य वितरण मंडळ व तीनही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी १९ टक्के पगारवाढीला राज्य शासनाने मंजुरी दिल्याने महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या नाशिक शहरातील पदाधिकाऱ्यांनी स्वागत करीत आनंद व्यक्त केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून संघटनेच्या माध्यमातून पगारवाढीसंदर्भात पाठपुरावा सुरू होता. (Salary increase of power company employees)
अखेर त्यास यश आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या मार्च महिन्यांपासून उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पगारवाढीसंदर्भातील बैठका सुरू होत्या.
अखेर रविवारी (ता. ७) झालेल्या बैठकीमध्ये १९ टक्के पगारवाढीसह सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ यावर शिक्कामोर्तब झाले आहे. संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरुद्दीन यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकान्वये जाहीर केले आहे. (latest marathi news)
बैठकीस उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, अप्पर मुख्य सचिव (ऊर्जा) अभा शुक्ला, अध्यक्ष तथा महावितरणचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, अध्यक्ष तथा महानिर्मितीचे महाव्यवस्थापक डॉ. पी. अन्बलगन.
अध्यक्ष तथा महापारेषणचे महाव्यवस्थापक डॉ. संजीवकुमार यांच्यासह संघटनेच्या वतीने अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे, सरचिटणीस सय्यद जहिरुद्दीन, कार्यकारी अध्यक्ष आर.पी.थोरात, उपाध्यक्ष ताराचंद कोल्हे, बी. डी. पाटील, एस. पी. शाहीर, विष्णू घोडके यांची उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.