किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा
Nashik Lok Sabha Election : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा महत्त्वाचा टप्पा पार पडल्यानंतर प्रशासन अधिकारी आता हिशोबाचा ताळेबंद तपासणीला लागले आहेत. मतदानासाठी प्रत्येक बुथनिहाय नियुक्त २१ हजार ३३२ कर्मचाऱ्यांना त्यांचे काम संपताच मानधन वितरित करण्यात आले. त्यासाठी प्रशासनाचे तीन कोटी ३७ लाख ८० हजार रुपये खर्च झाले आहेत. ( Salary of 3 crore to election employees in district )
याव्यतिरिक्त मंडप उभारणी, कर्मचाऱ्यांना जेवण आणि वाहनांची व्यवस्था यांचा हिशोब अजूनही बाकी असल्याने खर्चाचा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहोचणार असल्याची शक्यता अधिकाऱ्यांचा वर्तवली आहे. मतदान प्रक्रिया हा निवडणुकीतील महत्त्वाचा टप्पा असल्याने त्यासाठी निवडण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी फार महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक बुथवर एक पीठासीन अधिकारी (प्रिसायडिंग ऑफिसर), त्यांच्या अधिकारात प्रथम, द्वितीय व तृतीय पोलिंग ऑफिसर (मतदान केंद्र अधिकारी) नियुक्त करण्यात आले.
त्यांच्या मदतीला पोलिस व शिपाई असल्यामुळे या सर्वांची एक टीम प्रशासनाने तयार केली. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उच्च अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. या सर्वांना निवडणूक आयोगाने जबाबदारीनिहाय मानधन ठरवून दिले होते. विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया पार पडताच या कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपात मानधन वितरित करण्यात आले. प्रिसायडिंग ऑफिसरला सर्वाधिक १७०० रुपये तर त्यापाठोपाठ मतदान अधिकाऱ्यांना प्रत्येकी १३०० रुपये मानधन मिळाले.
कर्तव्यावर असणारे पोलिस, शिपाई, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांनाही मानधन वितरित केले. त्यासाठी प्रशासनाचे तीन कोटी ३७ लाख रुपये खर्च झाला आहे. यात आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा समावेश केलेला नाही. मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यांचे जेवण, टेबलचे नियोजन, संगणक, प्रिंटिंग, वीज जोडणी या सर्वांचा एकत्रित खर्च कोट्यवधी रुपयांच्या घरात जाणार आहे. त्याची जुळवाजुळव आत्तापासून सुरु झाली आहे. (latest marathi news)
अशी होते नियोजन
जिल्हाधिकारी जलज शर्मा हे नाशिक लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. तर दिंडोरीची जबाबदारी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्याकडे आहे. त्यांच्या मदतीला एक उपजिल्हाधिकारी, एक तहसीलदार, २१ नायब तहसीलदार, १५ आरओ, ३० एआरओ, १५ ईआरओ, १५ एईआरओ यांसह चार हजार ७३९ बूथ लेव्हर ऑफिसर (बीएलओ), झोनल ऑफिसर ४०८ इतके होते. या सर्वांच्या खांद्यावर निवडणुकीची जबाबदारी होती.
असे मिळाले मानधन
-पीठासीन अधिकारी (प्रीसायडिंग ऑफिसर)-१७०० रुपये.
-प्रथम मतदान अधिकारी-१३०० रुपये.
-द्वितीय मतदान अधिकारी-१३०० रुपये.
-तृतीय मतदान अधिकारी-१३०० रुपये.
-पोलिस शिपाई-८०० रुपये.
-शिपाई-७०० रुपये.
मतदारसंघनिहाय कर्मचारी
मतदारसंघ........मतदान केंद्र्...........पुरुष.......महिला
सिन्नर..................३४८...................९८६.........४३८
नाशिक पूर्व............३२६...................९१०.........५४२
नाशिक मध्य..........२९५...................९६९.........३३९
नाशिक पश्चिम......४१०...................११५३........६६७
देवळाली..................२६९...................७८५...........४१५
इगतपुरी...................२८९..................९६८...........३२०
नांदगाव...................३३१...................१०८९........३७९
कळवण....................३४५....................११५७........३७५
चांदवड......................२९६..................९७५............३४१
येवला........................३२०...................९९१............४२९
निफाड.......................२७३...................७८७............४२९
दिंडोरी.......................३५७....................११७६........४०८
मालेगाव मध्य.............३४३...................७६३...........७६१
मालेगाव बाह्य.............३३७...................१००२.........४९४
बागलाण......................२८८...................८९२...........३९२
एकूण..........................४८००.................१४६०३........६७२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.