नामपूर : महाराष्ट्राला शिवकालीन गड-किल्ल्यांचा समृद्ध वारसा लाभला असला तरी पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक किल्ल्यांची तटबंदी खिळखिळी झाली आहे. त्यामुळे राज्यातील ११ किल्ल्यांसह तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये केंद्र सरकारने मराठा लष्करी स्थापत्यअंतर्गत समावेश केला आहे. यात राज्यातील सर्वात उंच असलेल्या साल्हेर (ता. बागलाण) येथील शिवकालीन किल्ल्याचा समावेश आहे. किल्ल्याला भेट देण्यासाठी युनेस्कोची समिती ८ ऑक्टोबरपर्यंत किल्ल्याला भेट देणार आहे. (Salher Fort will be inspected by UNESCO committee for status of world tourism )