नाशिक : जिल्हा परिषद आरोग्य विभाग व महिला बालकल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सॅम व मॅम बालकांची धडक शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे. ११ ते २५ नोव्हेंबर दरम्यान ही मोहीम राबविली जाणार आहे. शोधमोहिम व आरोग्य तपासणी व लसीकरण मोहिमेसंदर्भात केलेल्या कामाचा अहवाल विहित कालावधीत पूर्ण करून २८ नोव्हेंबरपर्यंत जिल्हास्तरावर सादर करावे असे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहे. जिल्ह्याच्या आदिवासी तालुक्यांमध्ये प्रामुख्याने रोजगारानिमित्त स्थलांतरित होणारी कुटुंबे साधारणतः दिवाळीनिमित्त गावाकडे परतात. पावसाळ्यात कुपोषित बालकांची संख्या कमी होते. (Sam Mam children strike search campaign in district from tomorrow )