Nashik MD Drug Case: ‘एमडी’चे केरळ कनेक्शन उघड! नाशिक पोलिसांनी केली एकाला अटक

MD drugs crime
MD drugs crimeesakal
Updated on

नाशिक : सामनगाव एमडी ड्रग्ज (मॅफेड्रॉन) प्रकरणात नाशिक पोलिसांनी केरळमधून एका संशयिताला अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक पोलीस या संशयिताच्या मागावर केरळमध्ये दबा धरून होते. (Nashik samangaon Drug Case Kerala connection of MD exposed Nashik police arrested one person)

मोहम्मद अरजास एम. टी. ( रा. कोसीकोडा, केरळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गेल्या ७ सप्टेंबर रोजी नाशिकरोड पोलिसांनी गणेश शर्मा यास एमडी ड्रग्ज विक्री करताना अटक केली होती.

त्यानंतर शहर गुन्हेशाखा व अंमली पदार्थविरोधी पथकाने तपास करीत सनी पगारे व अर्जुन पिवाल यांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या.

तसेच, या दोन महिन्यात नाशिक पोलिसांनी सोलापुरमधील दोन कारखाने शोधून काढून ते उदध्‌वस्त केले. या संपूर्ण टोळीला बेड्या ठोकल्या.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, सहायक निरीक्षक हेमंत फड व हेमंत नागरे यांचे पथक तपास करीत केरळ राज्यापर्यंतचे धागेदोरे शोधत पोहोचले.

सहायक निरीक्षक फड व गुंडा विरोधी पथकाचे ज्ञानेश्वर मोहिते हे त्यांच्या पथकासह केरळमध्ये दिवसरात्र संशयित मोहम्मद याचा शोध घेत होते. अखेर तो हाताशी लागताच त्यास अटक करून नाशिकला आणले आहे.

MD drugs crime
Lalit Patil Drug Case : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात येरवडा कारागृहातील कॉन्स्टेबलला अटक; ससूनचा कर्मचारीही ताब्यात

१५ संशयितांना मोक्का

सामनगाव एमडी तस्करी प्रकरणात गणेश शर्मा, गोविंदा साबळे, आतिश उर्फ गुड्ड्या चौधरी, सनी व सुमित हे पगारेबंधू, मनोज गांगुर्डे, अर्जुन पिवाल, भूषण उर्फ राजा मोरे, मनोहर काळे, वैजनाथ हावळे, प्रथमेश मानकर यांच्यावर मोक्काअन्वये कारवाई करण्यात आलेली आहे.

हैदराबादेतून रसायनाची खरेदी

मुंबई-पुणे-नाशिक पोलिसांच्या एमडी ड्रग्जच्या तपासात पहिल्यांदा परराज्यातील संशयितास अटक करण्यात आली आहे. संशयित मोहम्मद याने केरळमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे कंपनी स्थापन केली.

या कंपनीसाठी तो हैदराबादमधून एमडी ड्रग्जसाठी लागणारे रसायनाची खरेदी करायचा आणि ते रसायन तो सनी पगारे याला सोलापूरमधील कारखान्यात पाठवत असल्याचे पोलीस तपासातून समोर आलेले आहे. याप्रकरणी आणखी काही पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

MD drugs crime
Lalit Patil Drug Case : ललित पाटील प्रकरणात धंगेकरांचा आंदोलनाचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.