नाशिक : आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर लोकसभा निवडणूक निर्विघ्न पार पाडण्याची मुख्य जबाबदारी पोलिसांवरच असते. त्यामुळे आत्तापासून पोलिसांनी अलर्ट मोडवर राहिले पाहिजे. राजकीय नेत्यांकडून गुन्हेगारांचा वापर होऊ शकतो, त्यापूर्वीच अशा गुन्हेगारांविरोधात विविध कलमान्वये कारवाई करावी. तसेच, मतदारांना ना-ना प्रकारे प्रलोभने दाखविण्याची शक्यता असते. (Nashik Sambhaji Patil statement of Police marathi news)
अशावेळी पोलिस अलर्ट असेल तर अशा घटनांना वेळी प्रतिबंध घालता येतो, असे प्रतिपादन सेवानिवृत्ती पोलिस उपअधीक्षक संभाजी पाटील यांनी केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक काळात पोलिसांनी कशाप्रकारे कामकाज करावे, यासंदर्भात शहर पोलिस आयुक्तालयातर्फे भीष्मराज बाम सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी संभाजी पाटील बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. पाटील म्हणाले, निवडणूक काळामध्ये मोठ्याप्रमाणात अवैध मद्याची तस्करी केली जाते. अलिकडे अंमलीपदार्थांचाही वापर केला जातो. त्यामुळे या काळात पोलिसांनी हद्दीमध्ये अवैधधंद्यांविरोधात कारवाई करून गुन्हे दाखल करावेत. (latest marathi news)
निवडणूका असल्याने विविध राजकीय पक्षांच्या सभा, रॅली, प्रचार फेर्यांचा जोर असतो. अशावेळी पोलिसांकडून परवानगी देताना वेळेची बंधने घालून द्यावीत. जेणेकरून वाद टाळता येऊ शकेल. मतदानाचा आधीचा दिवस आणि मतदानाचा दिवस या दोन दिवशी पोलिसांकडून चोख नियोजनाची अपेक्षा असते. पेट्रोलिंग, नाकाबंदी ठेवत बारकाईने नजर आपल्या परिसरावर ठेवावी, असेही मार्गदर्शन करताना सांगितले.
प्रारंभी, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रास्ताविक केले. उपायुक्त बच्छाव यांच्या हस्ते संभाजी पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, शेखर देशमुख, डॉ. सचिन बारी, डॉ. सीताराम कोल्हे, आनंदा वाघ, अंबादास भुसारे यांच्यासह पोलिस ठाण्यांचे प्रभारी पोलिस अधिकारी, निवडणूक कक्षाशी संबंधित पोलीस अधिकारी, अंमलदार कार्यशाळेसाठी उपस्थित होते.
प्रलोभने, गुन्हेगारांना आळा
निवडणूक काळात मतदारांना प्रलोभने दाखवून वस्तूंचे वाटप केले जाते. अशावेळी पोलिसांकडून कारवाई करताना पंच, साक्षीदारांसमक्ष करणे, त्यासाठीचे कलम लावताना अभ्यासपूर्वक त्यांचा वापर कराणे, रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात हद्दपारी, स्थानबद्धता, मोक्काअन्वये कारवाई करणे, गुन्हेगारांविरोधात समन्स वारंट बजावून प्रतिबंधात्मक कारवाई करणे अशा सूचनाही यावेळी केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.