सिडको : सिडको परिसरातील नागरिकांसाठी एकमेव मोठे मैदान म्हणून संभाजी स्टेडिअमकडे बघितले जाते. यासाठी लाखो करोडो रुपयांचा निधीदेखील आला. परंतु आजची परिस्थिती फार दयनीय दिसून येत आहे एवढा मोठा खर्च होऊनही आज संभाजी स्टेडिअम परिसरामध्ये विविध समस्यांनी नागरिक हैरान झाले असून ज्येष्ठ नागरिकांना येथील धुळीमुळे आरोग्याचे प्रश्न उपस्थित झाला आहे. (Nashik Sambhaji Stadium in trouble Neglect of nmc marathi news)
प्रशासकीय राजवटीमध्ये मनपा अधिकारी याकडे लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांनी मनावर प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सिडकोतील आश्विननगर परिसरातील संभाजी स्टेडिअम येथील जॉगिंग ट्रॅकवर धुळीचे साम्राज्य तसेच स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाने संभाजी स्टेडिअमची दुर्दशा थांबवावी व सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सिडकोतील संभाजी स्टेडिअम येथील जॉगिंग ट्रॅकवर दररोज सकाळी व सायंकाळी नागरिक फिरण्यासाठी येतात. येथील मैदानावर लहान मुले खेळतात. क्रिकेटचे सामने होतात. स्टेडिअममधील जॉगिंग ट्रॅकवर पाणी मारत नसल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच स्टेडिअमवर स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. (latest marathi news)
मनपा आरोग्य विभागाचे कर्मचारी स्वच्छता मोहीम राबवत नाही. त्यामुळे या स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त पाणी ट्रॅकवर येत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. मनपात सध्या प्रशासकीय राजवट आहे. ट्रॅकवर पाणी तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात यावे यासाठी नागरिकांनी मनपाकडे तक्रार करूनही मनपा अधिकारी दखल घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
"मागील दोन वर्षापासून मनपात प्रशासकीय राजवट आहे. असे असताना मनपा अधिकाऱ्यांनी संभाजी स्टेडिअमची कुठल्याही प्रकारची काळजी घेतली नाही. त्यामुळे आज अनेक समस्यांनी स्टेडिअम चर्चेत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून लाखो करोड रुपयांचा चुराडा झाला आहे."- अंकुश वराडे, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.