मनमाड : मी आमदार व्हायलाच पाहिजे, अशी काय अपेक्षा नाही. फक्त भयमुक्त नांदगाव तालुक्यासाठी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहोत. यामुळे महायुतीत अडचण निर्माण होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
जनतेच्या आग्रहाखातर आपण उमेदवारी करणार असून, तालुक्याचा विकास करण्याचे व्हिजन घेऊन निवडणुकीला सामोरे जात असल्याचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी गुरुवारी (ता. २४) येथे पत्रकार परिषदेत सांगितले.