Nashik Dengue Update : डेंगी बाधित रुग्णांचे नमुने तपासणीअभावी पडून; तपासणी किट संपल्यामुळे अहवाल प्रलंबित

Nashik News : डेंगी बाधित रुग्णांचे फेर तपासणीसाठी पाठविण्यात आलेले दोनशे रक्ताचे नमुने जिल्हा शासकीय रुग्णालयात असलेल्या शासकीय प्रयोगशाळेत तपासणीअभावी पडून असल्याची धक्कादायक समोर आली आहे.
dengue
dengue esakal
Updated on

Nashik News : शहरामध्ये डेंगीचा प्रादुर्भाव वाढत असताना शासन यंत्रणेत नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. खासगी रुग्णालयाकडून डेंगी बाधित रुग्णांचे फेर तपासणीसाठी पाठविण्यात आलेले दोनशे रक्ताचे नमुने जिल्हा शासकीय रुग्णालयात असलेल्या शासकीय प्रयोगशाळेत तपासणीअभावी पडून असल्याची धक्कादायक समोर आली आहे. (Nashik Dengue Update)

निदानासाठी आवश्यक असलेले डेंगी तपासणी किट संपल्यामुळे हे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरामध्ये डेंगी रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच केंद्रीय आरोग्य विभागाचे पथक नाशिक शहरांमध्ये दाखल झाले. जुलै महिन्यात डेंगीचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. पहिल्या पंधरवड्यामध्ये तब्बल २२५ डेंगी रुग्ण आढळून आले.

आत्तापर्यंत एकूण ४८४ डेंगी रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे नाशिक डेंगीच्या हॉटस्पॉट यादीत समाविष्ट झाले. डेंगीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य विभागाने घरोघरी तपासणी सुरू केली आहे. औषध व धूर फवारणी करण्यासाठी ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबरोबरच जवळपास पावणेदोनशे पथके घरांमध्ये सर्वेक्षण करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे.

दुसरीकडे मात्र जिल्हा रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. डेंगी आजाराचे निदान करण्यासाठी आवश्यक असलेले डेंगी तपासणी किट जिल्हा रुग्णालयातील सेन्टेनल लॅबमध्ये नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे डेंगी बाधितांची तपासणी होत नसल्याने जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलेले दोनशे रक्ताचे नमुने प्रलंबित आहे. (latest marathi news)

dengue
Nashik Police : आयुक्तांचा दणका, प्रभारींच्या उचलबांगडी; काही थेट कंट्रोल रूममध्ये

वाढत्या रोषाची भीती

वाढते डेंगी रुग्णाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष ॲक्शन मोडमध्ये आले आहे. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महापालिका आयुक्तांना पंधरा दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला, तर काँग्रेसकडून प्रतिकात्मक डेंगीच्या डासांची प्रतिकृती देण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील आंदोलनाचा इशारा दिला आहे.

एकंदरीत राजकीय दबाव वाढत असल्याने शासकीय यंत्रणेमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळेच डेंगीचा खरा आकडा बाहेर येऊ नये यासाठी डेंगी बाधितांची तपासणी किट संपल्याचे कारण देत असल्याचे बोलले जात आहे. खासगी रुग्णालयाकडून २०० रक्ताचे नमुने जिल्हा रुग्णालयातील सेंटीनल लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे.

dengue
Nashik News : महिलांसह बाळाचे वाचविले प्राण! तपोवन एक्स्प्रेस निघतानाची घटना

रक्त नमुने तपासणीसाठी दररोज लॅबमध्ये किट दाखल होत आहे. असे असताना कीट संपल्याचे कारण दिले जात आहे. जिल्हा रुग्णालयाकडून पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेला किट उपलब्ध करून देण्यासाठी ई-मेल पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

"डेंगी रुग्णांची खात्री करण्यासाठी खासगी रुग्णालयाकडून रक्त नमुने जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये पाठवले जातात. रुग्णालयातील तपासणी थांबली असल्याने अहवाल प्रलंबित आहे." - डॉ. नितीन रावते, मलेरिया विभागप्रमुख, महापालिका.

dengue
Nashik NMC : केंद्राकडून महापालिकेचा स्पार्क पुरस्काराने सन्मान!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.