Nashik News : नवनगरांना मुबलक पाणीपुरवठ्याची संजीवनी; पंचवटी, नाशिक रोड भागात नवीन पाइपलाइनला मंजुरी

Nashik : पंचवटी विभागातील बाह्य भाग व नाशिक रोडसह पाथर्डी फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात नवनगरांची निर्मिती होत असल्याने लोकसंख्या वाढली आहे.
pipeline
pipelineesakal
Updated on

Nashik News : पंचवटी विभागातील बाह्य भाग व नाशिक रोडसह पाथर्डी फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात नवनगरांची निर्मिती होत असल्याने लोकसंख्या वाढली आहे. परिणामी पाणीपुरवठ्यावरदेखील ताण निर्माण होत आहे. कमी दाबाने पाणीपुरवठ्याची दखल घेऊन शुक्रवारी (ता. १२) महासभेत जवळपास साडेसात कोटींच्या नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. शहराचा विस्तार वाढत असल्याने विशेषतः पाणीपुरवठा व मलनिस्सारण या पायाभूत सुविधांवर ताण निर्माण होत आहे. (Sanction of new pipeline in Panchavati Nashik Road area )

गेल्या काही वर्षात पंचवटी, नाशिक रोड तसेच पाथर्डी फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात नवनगर तयार होत असल्याने या भागात पाणीपुरवठ्याच्या जीर्ण पाइपलाइन बदलण्याबरोबरचं नवीन पाइपलाइन टाकण्याची मागणी आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्याकडे करण्यात आली होती. त्याअनुषंगाने महापालिकेकडे प्रस्ताव सादर करण्यात आले.

आचारसंहिता संपल्यानंतरच्या पहिल्याच महासभेत अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार पंचवटी व नाशिक रोड भागातील पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर पाथर्डी फाटा परिसरात नवनगरांमध्ये पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

या भागाला होईल लाभ

पंचवटी विभाग : प्रभाग १मधील वृंदावननगर, जिजामातानगर, दुर्गानगर, पोकार कॉलनी व म्हसरूळ गाव जुना वसाहत, प्रभाग २ मधील औरंगाबाद रोड, मिरची हॉटेल, इच्छामणीनगर, वृंदावननगर, श्रीरामनगर, प्रभाग ३ मधील सिद्धिविनायक जलकुंभ, अमृतधाम लिंक रोड, हिरावाडी, शिवकृपानगर, मोराडे मळा, रासबिहारी रोड, अवधूत कॉलनी, श्रीरामनगर, छत्रपतीनगर ते ठाकरे मळा, प्रभाग ५मधील शनी मंदिर ते नवनाथनगर, लोखंडी पूल, पंचवटी कारंजा ते महाराष्ट्र आयर्न मार्ट, कुमावतनगर, प्रभाग ६ मधील रामकृष्णनगर, कोळीवाडा, श्रीरामनगर, महादेव कॉलनी, सावतामाळीनगर, राजे छत्रपतीनगर, लीलावती हॉस्पिटल. (latest marathi news)

pipeline
Nashik News : मालेगाव महापालिकेत 125 जणांच्या बदल्या! मनमा आयुक्तांच्या तडकाफडकी निर्णय

नाशिक रोड विभाग : प्रभाग २२ मधील खर्जुल मळा परिसर, प्रभाग १७ मधील कॅनॉल रोड परिसर, चंपा नगरी, मंगलमूर्तीनगर, गोसावीनगर, आम्रपाली परिसर, ओमनगर, सातभाईनगर, गोदावरी सोसायटी, दसक शिवार, श्रीकृष्णनगर, प्रगतीनगर, करंजकरनगर, शिवरामनगर, एमएसईबी कॉलनी परिसर, टाकळी रोड परिसर, प्रभाग २१ मधील मुक्तिधाम, एमजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते रोकडोबावाडी ते आठवडे बाजार परिसर.

सिडको विभाग : प्रभाग ३१ मधील अवनी स्पर्श सोसायटी ते माढा कॉलनी परिसर, नवीन रो-हाऊस, सर्वे क्रमांक ३३२ मधील भवानीमातानगर-२,

प्रभाग १- ५० (वृंदावननगर, म्हसरुळ गाव परिसर)

प्रभाग २- ५०लाख (औरंगाबाद रोड, मिरची हॉटेल परिसर)

प्रभाग ३- ९९ लाख (अमृतधाम लिंक रोड परिसर)

प्रभाग ३- ६९ लाख (रासबिहारी रोड परिसर)

प्रभाग ५- ५९ लाख (पंचवटी कारंजा परिसर)

प्रभाग ६- ९४ लाख (सावतमाळीनगर परिसर)

प्रभाग १७- ९९ लाख (दसक शिवार परिसर)

प्रभाग १७- ४९ लाख (शिवरामनगर परिसर)

pipeline
Nashik News : शैक्षणिक दाखल्यांचा ‘सर्व्हर डाऊन’! महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले

प्रभाग २२- ५९ लाख (खर्जुल मळा परिसर)

प्रभाग १७- ९९ लाख (कॅनॉल रोड परिसर)

प्रभाग १८- ९९ लाख (श्रीकृष्णनगर परिसर)

प्रभाग २१- ७१ लाख (मुक्तिधाम मंदिर परिसर)

प्रभाग २१- ७४ लाख (छ. शिवाजी महाराज पुतळा परिसर)

प्रभाग ३१- ७५ लाख (म्हाडा कॉलनी परिसर)

''नवीन नगरामध्ये मुबलक पाणीपुरवठा होणे आवशक्य आहे. त्याअनुषंगाने प्राप्त प्रस्तावानुसार मंजुरी देण्यात आली असून, लवकरच कामांना सुरवात होईल.''- डॉ. अशोक करंजकर, आयुक्त, महापालिका.

''पंचवटी गावठाणासह म्हसरुळ, नांदूर, नाशिक रोड भागात पाणीपुरवठ्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन दारणातून नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. त्याचबरोबर कॉलनी अंतर्गत पाइपलाइन टाकण्याची मागणीला मंजुरी मिळाली.''- ॲड. राहुल ढिकले, आमदार

pipeline
Nashik News : शिर्डी-साक्री बायपासला उदासीनतेचा अडसर; रस्ता काँक्रिटीकरणाचे काम ठप्प झाल्याने नाराजीचा सूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.