Sanjay Raut Nashik Daura : प्रचाराला आले अन् प्रदर्शनात रमले संजय राऊत

Nashik News : पक्षाच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये खा. राऊत आले असता त्यांना अक्षर प्रदर्शनाबाबत कळले, त्यानंतर राऊतांनी अचानक मोर्चा कुसुमाग्रज स्मारकाकडे वळवला.
The Shiv Sena leaders Sanjay Raut watching the Akshar Bhet exhibition by Sunil Dhopavkar.
The Shiv Sena leaders Sanjay Raut watching the Akshar Bhet exhibition by Sunil Dhopavkar. esakal
Updated on

Nashik News : एकीकडे निवडणुकीचा प्रचार अन् अक्षर प्रदर्शन या दोन्हींमध्ये शिवसेना उबाठा नेते खा. संजय राऊत यांनी सहभाग नोंदवला. निमित्त ठरले कुसुमाग्रज स्मारकामध्ये संस्कृती नाशिकतर्फे आयोजित अक्षर रचनाकार सुनील धोपावकर यांचे नावांची अक्षरभेट अक्षर प्रदर्शन. (Nashik Sanjay Raut)

पक्षाच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये खा. राऊत आले असता त्यांना अक्षर प्रदर्शनाबाबत कळले, त्यानंतर राऊतांनी अचानक मोर्चा कुसुमाग्रज स्मारकाकडे वळवला. ज्याला मराठी असल्याचा अभिमान आहे, मराठी भाषेवर ज्याचे प्रेम आहे, जे मराठी वाचतात, मराठीमध्ये विचार करतात त्या प्रत्येकाने हे प्रदर्शन पहिले पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी मांडले. या प्रदर्शनात खा. राऊत रमले.

सुनील धोपावकर यांनी ३५,००० नावे आपल्या अक्षरकलेद्वारे अर्थासह समर्थपणे उलगडून दाखवली आहेत. हे मोठे व अफाट कार्य असून त्याची प्रचिती हे प्रदर्शन पाहताना वारंवार येते असेही ते म्हणाले. नाशिक ही कलावंतांची खाण असून या खाणीतील हिरे समाजा पुढे आणण्याचे काम संस्कृती नाशिक ही संस्था अविरत करीत असून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यामागची हीच भूमिका असल्याचे संस्कृतीचे अध्यक्ष शाहू खैरे म्हणाले.

याप्रसंगी संजय राऊत, सुधाकर बडगुजर यांना नावाची फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला. पंकज शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास आमदार नरेंद्र दराडे, शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, बाबा गायकवाड. (latest marathi news)

The Shiv Sena leaders Sanjay Raut watching the Akshar Bhet exhibition by Sunil Dhopavkar.
PM Modi Nashik Daura: कांदा प्रश्नावरून मोदींच्या सभेचे ठिकाण बदलाची शक्यता; जिल्ह्यात असंतोष, पोलिसांच्या गोपनीय शाखेचा अहवाल?

डॉ. कैलास कमोद, चित्रकार दिनकर जानमाळी, नाशिक कलानिकेतनचे अध्यक्ष रघुनाथ कुलकर्णी, मामा राजवाडे, विजय हांडगे पाटील यांसह कलाप्रेमी उपस्थित होते. रविवारी (ता.१२) प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून सकाळी दहा ते दुपारी दोन व सायंकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले असणार आहे. नाशिककरांनी प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन शाहू खैरे व संस्कृती नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

देवेंद्रकडे राऊतांचे लक्ष

यावेळी प्रदर्शनात देवेंद्र नावाकडे खा. राऊत यांनी निरखून पाहिले, त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यातून राऊतांचे देवेंद्रकडे लक्ष आहे, अशी मिश्कली होताच चांगलाच हशा पिकला.

The Shiv Sena leaders Sanjay Raut watching the Akshar Bhet exhibition by Sunil Dhopavkar.
Nashik Police : दत्तक गुन्हेगारांच्या अंमलदारांना दणका! पोलीस उपायुक्तांची कारवाई; अंबडच्या चौघांवर कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.