Sanjay Raut News : गद्दारी करणारे विधानसभेत दिसणार नाहीत; संजय राऊत यांची टीका; मनमाड येथील सभेत फुंकले निवडणुकीचे रणशिंग

Latest Political News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या अभीष्टचिंतन प्रसंगी श्री. राऊत सभेत बोलत होते. शिवसेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांनी केले.
Sanjay Raut
Sanjay Raut esakal
Updated on

मनमाड : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी स्थापन केलेल्या शिवसेनेशी विश्वासघात करून ज्यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली अशांना महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही. शांत स्वभावाचे गणेश धात्रक करेक्ट कार्यक्रम करणारे असल्यामुळे शिवसेनेशी गद्दारी करणारा आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मनमाड येथील सभेत करीत विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. (Sanjay Raut criticism on mahayuti)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या अभीष्टचिंतन प्रसंगी श्री. राऊत सभेत बोलत होते. शिवसेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांनी केले. यानिमित्ताने जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या विधानसभेच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत त्यांनी सभेतून दिले.

शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे, माजी आमदार नरेंद्र दराडे, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, पिंटू नाईक, सुनील बागूल, दत्ता गायकवाड, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, सुधाकर बडगुजर, बाबासाहेब राजवाडे, विलास शिंदे, उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद, सुनील पाटील, संजय कटारिया, ॲड. सुधाकर मोरे, माधव शेलार, काँग्रेस शहराध्यक्ष नाजीम शेख, सुनील गवांदे, रईस फारुकी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुधीर पाटील यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्व गैरव्यवहाराची चौकशी

‘शिवसेना हे चार शब्द जर सोबत नसते तर खराब बॅग्राऊंडवाले आमदार झाले नसते असे कुणाचेही नाव न घेता श्री. राऊत यांनी टीका केली. कुबड्यांवर असलेली मोदी सरकार राज्यात आघाडीची सत्ता येताच कोसळेल. मनमाडमध्ये उभारलेल्या पुतळ्यातही भ्रष्टाचार झाल्याचे सांगत शिवपुतळ्यावर टिपकणारे पावसाचे पाणी, मेघडंबरीचा उडालेला कलर, डॉ. आंबेडकर पुतळ्याचा पुन्हा तोडून बांधलेला चौथरा, शिवसेनेची सत्ता आल्यास या भ्रष्टाचाराची चौकशी करणार असाही दावा केला. (latest marathi news)

Sanjay Raut
Jayant Patil Shiv Swarajya Yatra : जनता आताही ‘मविआ’लाच सत्ता देणार; जयंत पाटील यांची ग्वाही

‘त्यांना’ वाचविण्याचा प्रयत्न

आमदारांना विकत घेऊन पक्ष फोडला, चिन्ह हिसकावले. परंतु न डगमगता उद्धव ठाकरे, शरद पवारांनी भाजपाच्या पुढे कडवे आव्हान उभे केले. खोट्या केसेसमध्ये मालेगावचे अद्वय हिरे, नांदगावचे संतोष गुप्ता यांना अडकवले. यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांना संपवण्याचा कट सत्ताधारी करत असल्याचा आरोप केला.

हातात बेड्या असताना पोलिसाची बंदूक घेऊन आरोपी गोळीबार करेल कसा असा प्रश्‍नही त्यांनी बदलापूर येथील घटनेप्रश्‍नी उपस्थित करून भाजपच्या लोकांना वाचविण्याचे प्रयत्न केले जात असल्याने बदलापूर प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी केली.

करंजवण योजना ठाकरेंची भेट

जिल्हाप्रमुख धात्रक यांनी करंजवण पाणीपुरवठा योजनेची मुहूर्तमेढ आम्ही सर्वांनी मिळून रोवली. ही योजना कुणा एकाची नाही. विद्यमान आमदार श्रेय लाटत असल्याचा आरोप केला. करंजवण योजना ही उद्धव ठाकरेंनी मनमाडला दिलेली भेट आहे. उपनेते

अद्वय हिरे यांनी, गणेश धात्रकांना आमदारकीच्या शुभेच्छा देताना मालेगाव तालुक्यातील पण या मतदारसंघात येणारे तिन्ही गटातील मतांचा गठ्ठा धात्रकांना देणार असल्याचे दावा केला. जावेद मन्सूरी यांनी सूत्रसंचालन केले.

Sanjay Raut
Nashik: पिंपरवाडी टोलनाक्यावर आंदोलन चिघळले! NHAIचे दुर्लक्ष, वेलजाळींचे 2 दिवसांपासून धरणे; चर्चेसाठी खासगी एजन्सीचे प्रतिनिधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.