Nashik Sanjay Raut : पंतप्रधान मोदी पाकिस्तानचे कांदा एजंट : संजय राऊत

Nashik News : भारतापेक्षा पाकच्या कांद्याचे निर्यात मूल्य जास्त असून पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान नसून पाकिस्तानचे एजंट असल्याची टीका शिवसेना(उबाठा) पक्षाचे नेते खासदर संजय राऊत यांनी केली.
Sanjay Raut
Sanjay Raut esakal
Updated on

Nashik News : गुजरातच्या कांद्याला निर्यातबंदी खुली करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील शेतकरी, व्यापारी यांच्याविषयी चिंता व्यक्त केली. पण पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांची चिंत‍ा नसून गुजरातचा व्यापारी, ठेकेदार जगला पाहिजे अशी त्यांची भुमिका आहे. (Sanjay Raut statement Prime Minister Modi Pakistan Onion Agent)

भारतापेक्षा पाकच्या कांद्याचे निर्यात मूल्य जास्त असून पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान नसून पाकिस्तानचे एजंट असल्याची टीका शिवसेना(उबाठा) पक्षाचे नेते खासदर संजय राऊत यांनी केली. नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्राचारासाठी खा.राऊत सभा घेणार आहेत.

यानिमित्त शुक्रवारी (ता.१०) रात्री नाशकात त्यांचे आगमन झाले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधान मोदी यांची शारीरिक व मनाची प्रकृती बरी नसावी म्हणून ते शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर बोलतात आणि ऑफर देत आहेत. (latest marathi news)

Sanjay Raut
Nashik Summer Heat : सर्वाधिक उष्माघाताचे 23 रुग्ण नाशिक जिल्ह्यात; रुग्णसंख्येत वाढ होण्याचा आरोग्य विभागाचा अंदाज

मोदी आणि त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव होणार आहे. मोदी दोनशेचा आकडा पार करणार नसून सगळा खेळ १७५ ते १८० जागांवर आटोपता होईल. उद्या कोणाच्या कुबड्या किंवा टेकू लागले. त्यासाठी ही सगळी जुळवाजवळ सुरू आहे.

मोदी चार जूननंतर भूतपूर्व पंतप्रधान होतील, असे भाकित खा.राऊत यांनी वर्तविले. तसेच पैसे, सोन्याचे बिस्किट वाटपाचे प्रकार सुरु असले तरी जनता तुम्हाला मतदान करणार नाही, असा टोला विरोधकांना लगावत निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

Sanjay Raut
Nashik Shantigiri Maharaj : देशासाठी निष्काम भावनेने कार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनाच मतदान करा : स्वामी शांतीगिरी महाराज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.