नाशिक : जिल्ह्यातील आदिवासी भागात पाच वयाखालील लहान मुलांमधील न्यूमोनियाचे प्रमाण मोठे आहे. त्यातून मृत्यू होण्याचे प्रमाणही अधिक आहे. बालमृत्यू दर शून्यावर आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे १२ नोव्हेंबरपासून सांस (सोशल अवेअरनेस अॅन्ड अॅक्शन टू न्यूट्रलाईज न्यूमोनिया) ही मोहीम राबविण्यात येणार आहे. २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे. वर्षभरात जिल्ह्यात २३८ बालमृत्यू झाले आहेत. (SANS campaign to prevent child mortality complete preparation for campaign by Zilla Parishad )