Sant Nivruttinath Palkhi : संत निवृत्तीनाथ महाराज पालखी घाट चढत डोंगरगणला मुक्कामी

Nashik News : डोंगरगण (ता. नगर जि. अहमदनगर) येथे १२ व्या दिवसाच्या मुक्कामी अर्थात निवृत्तीनाथांच्या हरीनामाचा जयघोषात हिरव्यागार डोंगरगणच्या घाट चढून सर्व वारकरी डोंगरगण येथे आले.
tractor attached to chariot instead of bullocks on ghat journey from Vambori to Dongargan
tractor attached to chariot instead of bullocks on ghat journey from Vambori to Dongarganesakal
Updated on

Nashik News : मानाच्या पालखी सोहळ्यात अत्यंत महत्वाचे स्थान अर्थात वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू असणारे संतश्रेष्ठ विश्वगुरू श्रीनिवृत्तीनाथ महाराज भव्य पायी पालखीचा आज (सोमवार) दुपारचा विसावा वांबोरी (ता.राहुरी) येथे झाला. यावेळी येथील वारकरी नारायण महाराज पागिरे यांनी स्वागत करून पालखीसाठी प्रतिवर्षीप्रमाणे रेशमी झालर व बैलासाठी अर्पण केली. (Sant Nivruttinath Maharaj)

डोंगरगण (ता. नगर जि. अहमदनगर) येथे १२ व्या दिवसाच्या मुक्कामी अर्थात निवृत्तीनाथांच्या हरीनामाचा जयघोषात हिरव्यागार डोंगरगणच्या घाट चढून सर्व वारकरी डोंगरगण येथे आले. घाटातील दृश्य अतिशय जसे की निसर्गाने वारकऱ्यांसाठी जणू काही शीतल छायेची छत्री धरल्यासारखे भक्तिमय वातावरण झाले होते.

वारकरी भगवी पताका आणि श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज यांचा हरिनामाचा जयघोष करत या पालखीचे भव्य दिव्य स्वागत डोंगरगण (ता. नगर) येथे वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ किर्तनकार पुंडलिक महाराज जंगले शास्त्री संस्थापित ज्ञानेश योगआश्रम वारकरी शिक्षण संस्था येथील बाल वारकरी, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ व नगरचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील.

पोलिस निरीक्षक माणिक चौधरी, सहाय्यक निरीक्षक देविदास भालेराव, राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, मंडळ अधिकारी नागवडे, ग्रामसेवक सुभाष कापसे, पोलिस पाटील आदिनाथ मते, सरपंच वैशाली मते यांनी या अतिशय भव्य दिव्य स्वरूपात दिंडीचे स्वागत केले. पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त नियोजन केले होते. (latest marathi news)

tractor attached to chariot instead of bullocks on ghat journey from Vambori to Dongargan
Nashik Junior Collage Admission : पहिल्‍या फेरीत 6 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश; दुसऱ्या फेरीची उद्यापासून प्रक्रिया

यंदा संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज यांचे जन्मोत्सवाचे ७५१ वर्ष असल्याने पालखी सोहळ्यात हजारो वारकरी पंढरपूरच्या दिशेने जात आहे. पायी पालखी सोहळ्यातील दिंडी सोहळा सुखकर व व्यवस्थापन चांगले होण्यासाठी शासनाच्या माध्यमातून व स्थानिक ग्रामस्थांच्या फार मोठ्या सहकार्याने निर्मल वारी, आरोग्यदायी वारी, प्लॅस्टिकमुक्त वारी, स्वच्छतादायी वारी, सुरक्षित वारी यासह विविध व्यवस्था करण्यात येत आहे

या पालखी सोहळ्यामध्ये डोंगरगण येथील भजनी मंडळ, ग्रामस्थांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी संस्थांनच्या अध्यक्षा कांचनताई जगताप, पालखी सोहळा प्रमुख नारायण मुठाळ, विश्वस्त राहुल महाराज सांळुखे, विश्वस्त तथा प्रसिद्धीप्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे, पुजारी जयंत महाराज गोसावी आदींचा डोंगरगण ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

tractor attached to chariot instead of bullocks on ghat journey from Vambori to Dongargan
Nashik Teacher Constituency Result : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत किशोर दराडे दुसऱ्यांदा उत्तीर्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.