Sant Nivruttinath Palkhi : संत निवृत्तिनाथांची पालखीचा उद्या रिंगण सोहळा; स्वागतासह मुक्कामाच्या ठिकाणी वैद्यकीय पथक

Nivruttinath Palkhi : पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या संत निवृत्तीनाथ पायी पालखीचे सोमवारी (ता.२४) सिन्नर तालुक्यात आगमन होत आहे.
Saint Nivrittinath palanquin passed by
Saint Nivrittinath palanquin passed byesakal
Updated on

Sant Nivruttinath Palkhi : संत निवृत्तीनाथ पालखीत मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य पथके राहणार तैनात.. आरोग्य पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या संत निवृत्तीनाथ पायी पालखीचे सोमवारी (ता.२४) सिन्नर तालुक्यात आगमन होत आहे. दोन मुक्काम आणि तीन दिवस तालुक्यात राहणाऱ्या या पालखीचे मंगळवारी (ता.२५) पहिले रिंगण दातली (ता.सिन्नर) येथे होईल. दिंडी मार्गावर ठिकठिकाणी स्वागतासह वारकऱ्यांच्या आरोग्याचा भार वाहण्यासाठी सिन्नर तालुका आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. ( Sant Nivruttinath palkhi arena ceremony tomorrow)

दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी प्रत्येकी पाच जणांचा समावेश असलेली आरोग्य पथके तैनात राहणार आहेत. याशिवाय दिंडी मार्गावरही २२ आरोग्यदूत वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी मोहन बच्छाव यांनी दिली.

२२ आरोग्य केंद्र सज्ज

संपूर्ण पालखी मार्गावर २२ आरोग्य केंद्रांकडे प्रथमोपचार किट ठेवण्यात आले आहेत. किरकोळ इजा झाल्यास लागलीच वारकऱ्यांवर उपचार केले.जातील. ज्या मार्गावरून दिंडी जाणार आहे, तेथील पालखी मार्गाच्या बाजूचे सर्व पाणी स्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. टीसीएल नमुने घेण्यात आले आहेत. रस्त्याच्या कडेच्या हॉटेलमधील कामगारांची तपासणीही करण्यात आली आहे. दिंडीसोबत असलेल्या सहा टँकरच्या माध्यमातून शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे

आज आगमन

उद्या सोमवारी (ता.२४) चिंचोली फाट्यावर आगमन होईल, मोहदरी घाटातून नाथांची पालखी पास्ते घाटमार्ग पास्ते आणि तिथून लोणारवाडीत मुक्कामी येईल. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.२५) सिन्नर मार्गे ही पालखी कुंदेवाडी, मुसळगाव येथून दातलीत आल्यानंतर तेथे पहिले गोल रिंगण सोहळा होईल. त्यानंतर खंबाळे येथे दिंडीचा मुक्काम होईल. शेवटच्या तिसऱ्या दिवशी भोकणी, सुरेगाव, मरहळ, निऱ्हाळे मार्गे नगर जिल्ह्यातील पारेगाव येथे दिंडी मुक्कामी जाईल. ११ गावांतून जाणारी ही पायी दिंडी दोन ठिकाणी मुक्काम करेल. तालुक्यातून ६० किलोमीटरचा प्रवास वारकऱ्यांना करावा लागेल. (latest marathi news)

Saint Nivrittinath palanquin passed by
Sant Nivruttinath Palkhi : दीड महिन्यांनंतरही वारकऱ्यांचा उत्साह कायम! निवृत्तीनाथांच्या दिंडीचे चिंचोलीत आगमन

जोरदार तयारी

संस्थांचे अध्यक्ष हभप कांचनताई जगताप, सचिव अमरजी ठोंबरे, पालखी सोहळा प्रमुख नारायणजी मुठाळ, माजी अध्यक्ष निलेश गाढवे, माजी सचिव अॅड सोमनाथ घोटेकर, एकनाथ महाराज गोळेसर, बीडीओ अशोक भवारी , दातली येथील ग्रामस्थ उपस्थित होते. संत निवृत्तीनाथ पालखीच्या स्वागतासाठी सिन्नर पोलीस स्टेशनचे व एमआयडीसी सर्व पोलीस तसेच वारकरी व नागरिक परिश्रम घेत आहेत.

वाजे पतसंस्थेचा दवाखाना

येथील येथील खासदार राजाभाऊ वाजे यांनी मागील वर्षापासून लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे पतसंस्थेच्या सहकार्याने वारकऱ्यांच्या सेवेसाठी मोफत फिरता दवाखाना उपलब्ध करुन दिला आहे. पालखीसोबत मोफत दवाखान्यांत पाच डॉक्टरांसह दहा कर्मचाऱ्यांचे पथक २४ तास सेवेत असते.

वैद्यकिय पथकात डॉ. आर डी नाईकवाडी, डॉ सारंग जाधव ,डॉ सुनील जाट, डॉ रामदास लोहरे आदीनी मागील वर्षी २१ ते २२ दिवस वारकऱ्यांना फिरत्या दवाखान्याची सेवा दिली होती. दिवसाला पाचशे ते हजार वारकऱ्यांची तपासणी करुन ९ हजार सहाशे वारकऱ्यांना मोफत औषध देण्यात आले. सर्दी, खोकला, ताप, डोळे, हातपाय दुखणे, उलट्या, जुलाब होणाऱ्यावर उपचार करण्यात आले.पायपीट करणाऱ्या वारकऱ्यांच्या पायाला आयुर्वेदिक तेलाने मालिश केली जाते.

- मंगळवारी दातली गावात पहिला रिंगण सोहळा

- ११ गावांतून पायी दिंडीचे दोन ठिकाणी मुक्काम

- तालुक्यातून दिंडीचा ६० किलोमीटरचा प्रवास

- आपत्कालीन स्थितीत रुग्णवाहिकेची सोय

Saint Nivrittinath palanquin passed by
Sant Nivruttinath Palkhi : वारकऱ्यांसाठी रुग्णवाहिकेसह ‘श्वास’तर्फे डॉक्टरांचे पथक; 4 डॉक्टर सतत 28 दिवस देणार सेवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.