Sant Nivruttinath Palkhi : वारकऱ्यांच्या दारी राजकारण्यांची वारी! ज्येष्ठांसह तरुण वारकऱ्यांकडून नापसंती व्यक्त

Nashik News : यंदा वारकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, त्यात तरुणांची संख्याही लक्षणीय आहे. या वारकऱ्यांनी वारीत मोठ्या प्रमाणात राजकारण्यांचा उदो-उदो सुरू झाल्याबाबत नापसंती व्यक्त केली.
Sant Nivruttinath Palkhi
Sant Nivruttinath Palkhi esakal
Updated on

Nashik News : पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज वारीतील वारकऱ्यांना विठूरायाच्या भेटीची आस लागली आहे. यंदा वारकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, त्यात तरुणांची संख्याही लक्षणीय आहे. या वारकऱ्यांनी वारीत मोठ्या प्रमाणात राजकारण्यांचा उदो-उदो सुरू झाल्याबाबत नापसंती व्यक्त केली. (Sant Nivruttinath Palkhi Politicians also participate in wari)

दरम्यान, पालखी सोहळ्याने आज अहमदनगरकडे प्रस्थान केले. एकच ध्यास विठूरायाला भेटण्याची आस... असे म्हणत पालखी सोहळ्याची तप्त डांबरी रस्ता, तर काही ठिकाणी चढ-उतार करीत पंढरीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. अठरा वर्षांच्या तरुणापासून ८० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत वारीत वारकरी चालत आहेत.

संस्थानच्या अध्यक्षांनी वारीत राजकारण आणू नये, अशा भावना या वेळी सामान्य वारकऱ्यांनी व्यक्त केल्या. ज्येष्ठ वारकरी संपतदास महाराज धोंगडे, पुंडलिक थेटे यांनी सांगितले, की संत ज्ञानोबा-तुकोबा महाराजांप्रमाणे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांचा पालखी सोहळाही भव्य व देखणा व्हावा, तसेच वारीत राजकीय हस्तक्षेप होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सामान्य वारकरी केंद्रस्थानी ठेवून वारीची वाटचाल असावी. वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची आस असते. त्यांना राजकारणाशी काही देणे-घेणे नसते. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप हा वारीत नकोच, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, की पालखी प्रस्थानाच्या वेळी मोठमोठे राजकीय नेते येतात. त्यामुळे सामान्य वारकऱ्यांना ताटकळत बसावे लागते. (latest marathi news)

Sant Nivruttinath Palkhi
Sant Nivruttinath Palkhi : ओठी नाथांचे अभंग, वारकरी झाले दंग! संत निवृत्तिनाथांची पालखी संगमनेरमध्ये दाखल

निष्ठावंत वारकऱ्यांची दैनंदिनी ठरलेली असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पंढरीला जाणारी मोठी पालखी म्हणून राज्यात ओळख आहे. तसेच, वारकरी संप्रदायाचं आद्यपीठ असलेल्या त्र्यंबकनगरीला जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग व निवृत्तिनाथांची समाधी यामुळे वेगळी ओळख आहे. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ हे वारकरी संप्रदायाचे आद्य गुरू आहेत.

त्यांच्या पालखीत फक्त वारकरीच केंद्रस्थानी हवा. राजकारणांचा उदो उदो केल्याने सामान्य वारकरी नाराजी व्यक्त करीत आहे. पंढरपूरला जाणारी नाथांची पालखी ही महाराष्ट्रात वेगळेपण जपत आहे, ते अबाधित राहिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

"दिंडीबरोबर वर्षानुवर्षे चालणाऱ्या ज्येष्ठ वारकऱ्यांचा सन्मान व्हावा, राजकीय हस्तक्षेप टाळून दिंडीचे पावित्र्य जपण्यात यावे." - संपत महाराज धोंगडे

Sant Nivruttinath Palkhi
Sant Nivruttinath Palkhi : पंढरीची वारीमध्ये धरला अनेकांनी फेर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.