लेखक : ॲड. सुशील अत्रे
आपण यापूर्वीच प्राचीन भारतातील ‘त्रिपक्षीय संघर्षा’ची माहिती घेतली आहे. ‘कन्नोज’ या राजधानीवर आपली सत्ता असावी, यासाठी प्रतिहार आणि पाल यांच्या जोडीने तिसरे जे राजघराणे कायम संघर्षात असे, ते म्हणजे ‘राष्ट्रकूट’. त्या काळातील सारे राजकारण याच तीन राजवटींभोवती फिरत होते.
राष्ट्रकूट हा अधिकारदर्शक शब्द आहे. प्राचीन भारतात मोठ्या भूप्रदेशाला ‘राष्ट्र’ म्हणत असत. ‘कूट’ म्हणजे अधिपती किंवा शासक. अशा संदर्भात काही मोठ्या प्रदेशाचे प्रशासन सांभाळणारे ते राष्ट्रकूट म्हणून ओळखले गेले. (saptarang latest article on Rashtrakuta dynasty)