सह्याद्रीचा माथा : 'इस्पॅलिअर'चा सन्मान, शिक्षणातील बदलांची नांदी

Marathi Article : गेल्या आठवड्यात इस्पॅलिअर हेरिटेज स्कूलला राज्य सरकारकडून दिला गेलेला पहिला 'माझी शाळा-सुंदर शाळा' पुरस्काराने गौरविण्यात आले.
Espalier School and Sachin Joshi
Espalier School and Sachin Joshiesakal
Updated on

देशातील प्रत्येक नागरिकाशी संबंधित विषय म्हणजे शिक्षण. उत्तम दर्जाचे शिक्षणाच्या समान संधी सर्व घटकांतील मुलांना मिळणे हा मुलांचा संवैधानिक हक्क आहे. सध्याच्या शिक्षण क्षेत्राकडे पाहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे या क्षेत्रात खूप मोठे बदल आगामी काळात होणार आहेत.

नवे शैक्षणिक धोरण (New Education Policy) हा त्यातील एक महत्त्वाचा टप्पा. परंतु या संक्रमणाच्या काळामध्ये जे काही मोजके लोक, संस्था हे बदल हेरण्याची क्षमता ठेवणारे आहेत, त्यात नाशिकच्या इस्पॅलिअर शाळेचा आणि या शाळेचे संस्थापक सचिन जोशी यांचा समावेश निश्चितपणाने आहे. गेल्या आठवड्यात इस्पॅलिअर हेरिटेज स्कूलला राज्य सरकारकडून दिला गेलेला पहिला 'माझी शाळा-सुंदर शाळा' पुरस्काराने गौरविण्यात आले. नाशिकसाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे. (nashik saptarang latest Marathi article by dr rahul ranalkar on Espalier school marathi news)

शिक्षण क्षेत्राकडून समाजाच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत आहेत. शिक्षणातून पुढची पिढी घडते, त्यामुळे पालकांना देखील शाळांकडून आणि शिक्षकांकडून मोठ्या आशा आहेत. या अपेक्षांचे ओझे वाहत असताना संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे देखील अनेक समस्यांमधून जात आहेत.

मात्र, असे असले तरीदेखील सर्व समस्यांवर मात करुन पुढची पिढी घडविण्यासाठी जे-जे सकारात्मक, संशोधनात्मक आणि सर्जनशील करणे आवश्यक आहे, ते सर्वच संस्थांनी करायला हवे. काळाची पावले ओळखून इस्पॅलिअर स्कूलने अनेक प्रयोगशील गोष्टी हेरून त्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केल्या. किंबहुना 'माझी शाळा-सुंदर शाळा' हा सन्मान याच बदलांना स्वीकारणारा, ओळखणारा आणि पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. 

५१ लाखांचा राज्यातील खाजगी शाळांच्या गटातील पुरस्कार देताना ज्या गोष्टींचा प्रामुख्याने विचार झाला, त्याचा विचार शिक्षणासह समाजातील सर्व घटकांनी करणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये कागदाचा वापर टाळत संगणकीय प्रणाली राबविणे, आर्थिक साक्षरता, वीज बचतीचे मार्ग अवलंबणे,  डिजिटल उपकरणांचा वापर करणे, मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, लोकशाही मूल्ये रुजविणे, परसबाग, वृक्षसंवर्धन, मूल्यसंस्कारांसह विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजविण्याचे शाळेकडून होणाऱ्या प्रयत्नांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला.

राज्य शासनाच्या वेगवेगळ्या पाच समित्यांनी शाळेला भेट देऊन या सगळ्या मुद्यांच्या आधारे तपासणी केली. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविले जाणारे उपक्रम यांचीही सखोल माहिती घेण्यात आली. शंभर गुणांच्या या मूल्यमापनात इस्पॅलिअर हेरिटेज स्कूलला ९७.५ टक्के गुण मिळाले. शाळेचे सौंदर्यीकरण, स्वच्छता आणि खासकरुन शाळेतील शेतीचे उपक्रमांची दखल समित्यांनी घेतली. (Latest Marathi News)

Espalier School and Sachin Joshi
बाईपण भारी देवा!

शाळेच्या विकासात आणि सर्वोत्तम बनण्याची प्रक्रिया सतत सुरु ठेवण्यासाठी आग्रही असणारे शाळेचे संस्थापक सचिन जोशी यांचाही उल्लेख करणे अत्यंत गरजेचे आहे. सातत्याने, अखंडितपणे केवळ केवळ आणि शिक्षणाचा ध्यास घेऊन कार्यरत असलेले सचिन जोशी हे शिक्षण अभ्यासक असले तरी देखील एक प्रयोगशील संस्थाचालक देखील आहेत.

देशभरातून ज्या ज्या संस्थांमधून वेगळे उपक्रम राबविले जातात, त्यांचा अभ्यास करुन आपल्याकडे त्यातील किंवा त्याहून अधिक चांगले काय करता येईल, याचा सतत ते धांडोळा घेत असतात. शिक्षणासंबंधीची त्यांची आस्था ही विलक्षण आहे. त्यामुळेच संस्थेला मिळालेल्या ५१ लाख रुपयांच्या बक्षीसातून ग्रामीण भागातील शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांसाठी फिरती शाळा सुरु करण्याचा संकल्प त्यांनी केला.

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी ही फिरती शाळा कार्यरत राहणार आहे. त्यासोबत काही शाळांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्याचा त्यांचा मानस आहे. बक्षीसाची संपूर्ण रक्कम सरकारी शाळांच्या विकासासाठी वापरण्याचा केलेला संकल्प निश्चितपणे कौतुकास्पद आहे. 

Espalier School and Sachin Joshi
ताडोबाची राणी ‘माया’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.