लेख लिहिण्याच्या सुरुवातीलाच मला हा प्रश्न पडला आणि त्याच वेळी मला ओशोंचे एक प्रवचन सापडले. ओशो आपल्या प्रवचनात म्हणतात, ‘एक बार चाकू, खंजर, तीर और तलवार ये चारो शस्त्र आपसमें लड़ रहे थे, की कौन कितना ज्यादा गहरा घाव देता है! तभी पीछे बैठे ‘शब्द’ने मुस्कुराकर इतना ही कहा, ‘जरा मुझे भी तो आजमाकर देखिये!’ एकाच वाक्याची काय सुंदर बोधकथा आहे ही बघा ! यावरूनच एक वाक्य आठवलं, बोलताना शब्द जपून वापरावा.
कारण शब्दाला तलवारीपेक्षा जास्त धार असते. तलवार आणि शब्द यात फरक इतकाच की तलवारीने ‘मान’ कापली जाते, तर शब्दाने ‘मन’. याच धर्तीवर एक मराठी कवी म्हणतो, ‘हळवी असतात ती मनं, जी शब्दांनी मोडली जातात; पण शब्दच असतात ‘जादुगार’ ज्यांनी तोडलेली माणसंही जोडली जातात.’ (saptarang latest article on Words Enemy or Friend)