Nashik Saptashrungi Chaitrotsav: ‘खण चोळी लेवानी से, मनी अंबा माता ले...’ डीजेच्या गाण्यांवर ठेका धरत भाविक गडाच्या दिशेने

Nashik News : आद्यस्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या चैत्रोत्सवासाठी हजारो भाविक सप्तशृंगगडाकडे पायी निघाले आहेत
Devotees Marching towards wani gad
Devotees Marching towards wani gadesakal
Updated on

पिंपळगाव (वा.) : सप्तशृंगी मातेचा जयघोष, ढोल-ताशांचा गजर, डीजेवरील देवीच्या गाण्यांनी सप्तशृंग गडाकडील रस्ते निनादून गेले असून, खानदेश प्रांतातून पायी येणाऱ्या यात्रेकरूंच्या गर्दीने गडाकडे येणारे रस्ते फुलले आहेत. आद्यस्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या चैत्रोत्सवासाठी हजारो भाविक सप्तशृंगगडाकडे पायी निघाले आहेत.

‘डोंगर हिरवागार, माय तुना डोंगर हिरवागार’, ‘खण चोळी लेवानी से, लेवानी से मनी अंबा माता ले’ अशा गीतांवर नृत्य करीत आणि देवीचा जयघोष करीत निघालेल्या भाविकांमुळे नांदुरी गडाकडील रस्ता गर्दीने फुलला आहे. पायी येणाऱ्या भाविकांची ठिकठिकाणी पाणपोईची व्यवस्था करून तृष्णा भागवली जात आहे; तर काही ठिकाणी महाप्रसाद वितरित केला जात आहे. (Nashik Saptashrungi Chaitrotsav devotees marching towards gad)

भाविकांच्या गर्दीने कळवण-नांदुरीपर्यंतचा मार्ग भक्तांच्या गर्दीने फुलला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांची हद्द ओलांडत भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे नांदुरी गडाच्या दिशेने निघाल्याने भक्ती आणि श्रद्धेचे अनोखे रूप पाहायला मिळत आहे. अंतर चालताना या भाविकांमध्ये महिला- पुरुष, आबालवृद्ध सामील झाले आहेत.

कळवण, मानूर, कोल्हापूर फाटा, आठंबे, गोबापूर परिसरात या पायी यात्रेला जणू काही विराट मोर्चाचेच रूप प्राप्त झाल्याचे दिसत आहे. गडाकडे येणाऱ्या पालख्या, भाविक आणि त्यांचा वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. (latest marathi news)

Devotees Marching towards wani gad
Loksabha Election: 2019 च्या तुलनेत पहिल्या टप्प्यातील मतदानात 4 टक्क्यांनी घसरण, वाचा काय सांगते आकडेवारी

सप्तशृंगगडावर विश्वस्त संस्थेतर्फे निवाऱ्यासाठी टेंट उभारण्यात आले आहेत. शिवालय परिसराच्या बाजूला प्रसाधनगृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मंदिर परिसरात आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. हजारो भाविक गडाच्या दिशेने खानदेश प्रांतातील विविध ठिकाणांहून अनवाणी प्रवास करून नांदुरी, सप्तश्रृंगगड परिसरात दाखल होत आहेत. खानदेशी-अहिराणी गाण्यांवर भाविकांनी ठेका धरला. ‘कसमादे’ परिसर या गाण्यांनी दणाणून सोडला आहे.

कपाळी कुंकू लावत देवीचरणी लीन

पहाटेपासून भाविक पायी प्रवासाला सुरवात करतात. त्यानंतर उन्हाची तीव्रता वाढली की सावलीचा आसरा घेत आराम करतात. सायंकाळी पुन्हा उन्हाची तीव्रता कमी झाली, की पुन्हा पायी प्रवास करतात. रात्री उशिरापर्यंत मजल-दरमजल करीत गडावर पोहोचतात. घरून आणलेले धान्य, खणा-नारळानं देवीची ओटी भरतात. देवीच्या पायरीवरील कुंकू आपल्या कपाळी लावत देवीचरणी लीन होतात.

Devotees Marching towards wani gad
Dhule Lok Sabha Constituency 2024 : भाजप अन् काँग्रेस उमेदवारांपुढे अंतर्गत गटबाजीचे आव्हान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.