Saptashrungi Devi Chaitrotsava : राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील चैत्रोत्सवाला मंगळवार (ता. १६)पासून प्रारंभ होत आहे. चैत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १७ ते २३ एप्रिलपर्यंत गडावर जाण्यासाठी खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली असून, या मार्गावर लालपरी भाविकांची वाहतूक करणार आहे. (nashik Saptashrungi Devi temple State Transport Corporation is ready for Adimaya Chaitrotsav marathi news)
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून नांदुरी ते सप्तशृंगगड यादरम्यान शंभर, तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या आगारांतून पन्नास जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. दर वर्षी सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. विशेषतः चैत्रोत्सव यात्रेत खानदेशहून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून भाविक गडावर दाखल होत असतात.
भाविकांची ही संख्या लक्षात घेऊन यात्रोत्सवाच्या काळात जिल्हा प्रशासनाने गडावर येण्या-जाण्यासाठी खासगी वाहनांना बंदी केली आहे. भाविकांना वेळेत व सुलभ दर्शन व्हावे, यासाठी एसटी प्रशासनाने अगोदरपासूनच जादा बसचे नियोजन केले आहे. यात्रा कालावधीसाठी राज्य परिवहन महामंडळाने नांदुरी येथे गडाच्या पायथ्याशी व गडावरील जलशुद्धीकरण केंद्राजवळ तात्पुरते वाहतूक केंद्र तयार करण्यात येत आहे. नाशिक येथे जुन्या बसस्थानकात यात्रा वाहतूक केंद्र असणार आहे. (latest marathi news)
भाविकांसाठी सुविधा व सुरक्षा
गडावर येणाऱ्या भाविकांची उन्हामुळे गैरसोय होऊ नये, यासाठी नांदुरी आणि सप्तशृंगगड येथील बसस्थानकांमध्ये तात्पुरत्या निवारा व दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात येत आहे. बसस्थानकावरच प्रवाशांसाठी स्वच्छ पाणी ही टॅंकरद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नांदुरी व सप्तशृंगगड येथील वाहनतळावर इंधन देखभाल व दुरुस्तीसाठी सुट्या भागांच्या पुरवठ्यासह कार्यशाळा कर्मचाऱ्यांची नेमणूक तसेच क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविक तसेच घाटामध्ये चालकांना मार्गदर्शन करण्यासाठी यू-टर्न, गणपती टप्पा, मंकी पॉइंट या भागात महामंडळाकडून विशेष कर्मचारीदेखील नियुक्त करण्यात आल्याची माहिती विभाग राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आली.
असे असले बसचे नियोजन... नांदुरी ते सप्तशृंगगड
१७ एप्रिल---५०, १८ एप्रिल--- ६० १९ ते २४ एप्रिल १०० (प्रतिदिन) नाशिक १ या आगारातून ७, नाशिक- २ आगारातून ३, मालेगाव आगार १०, मनमाड ५, सिन्नर ५, इगतपुरी ५, लासलगाव ५, पेठ ५, पिंपळगाव ५ याप्रमाणे आगार ते थेट सप्तशृंगगड यादरम्यान एकूण पन्नास जादा बस. धुळे, जळगाव जिल्ह्यातील आगारातूनही शंभरच्या वर बस.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.