Saptashrungi Devi Gad : सप्तशृंगी गड घाट रस्ता मलबा हटविण्यासाठी सोमवारी सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत राहाणार बंद!

Latest Nashik News : सप्तशृंगी गड घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहीती सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ४ कळवणचे सहाय्यक अभियंता रोहिणी वसावे यांनी दिली आहे.
Saptashrungi Gad ghat road debris
Saptashrungi Gad ghat road debrisesakal
Updated on

वणी : श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडाच्या घाट रस्त्याच्या सुरु असलेल्या दरड प्रतिबंधक उपाय योजनेच्या कामासाठी सोमवार ता. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत (पाच तास) नांदुरी ते सप्तशृंगी गड घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहीती सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ४ कळवणचे सहाय्यक अभियंता रोहिणी वसावे यांनी दिली आहे. (Saptashrungi Gad Ghat road will closed to remove debris)

सप्तश्रृंगी गडावर श्री. सप्तश्रृंग निवासीनी देवी नवरात्र उत्सव ता. ०३ ते १२ ऑक्टोबर तसेच कोजागिरी पौणिमा ता. १६ व १७ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. त्याअनुषंगाने, सहाय्यक अभियंता श्रेणी १ सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ४ कळवण नाशिक यांनी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना यांना पत्र देत सप्तश्रृंगीगड ते नांदुरी या रस्त्यावर दरड प्रतिबंधक उपाययोजना जाळी बसविणे व बॅरियर बसविणे हे काम प्रगतीपथावर असल्याने या रस्त्यावर सैल खडक दरड काढण्याचे काम सुरु असल्यामुळे रस्त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने व नागरिकांच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ता. २३, २५ व २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत व तारखेस वाहतूक बंद करणे बाबत कळविले होते.

त्यानुसार सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश यांचे आदेशाने तीन दिवस रस्ता बंद ठेवण्यात आला होता. परंतु, कुमकुवत धोकेदायक दगड व मलबाचे प्रमाण जास्त असल्याने उर्वरित मलबा काढण्यासाठी अतिरिक्त १ दिवसाची आवश्यकता असल्याचे पत्र सहाय्यक अभियंता रोहिणी वसावे यांनी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना देवून ३० सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत नांदुरी ते सप्तशृंगी गड दरम्यानची वाहतुक बंद करणे आवश्यक असल्याचे कळविले होते. (latest marathi news)

Saptashrungi Gad ghat road debris
Latest Maharashtra News Updates: खडकवासला परिसरात विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस

त्यानूसार अकुनुरी नरेश यांनी सुरक्षेतच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३४ नुसार सदरचा मार्ग बंद करण्यात येणार असल्याचा आदेश दिला असून कामादरम्यान कोणतीही जिवित व वित्त हानी होणार नाही, याची संबधीत यंत्रणा यांनी नोंद घेण्याचेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Saptashrungi Gad ghat road debris
BJP Government: सनातन धर्म रक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना होणार? राष्ट्रपतींकडे केली मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.