Nashik MSRTC News : आता ई-बसने नाशिक-सप्तशृंगगड प्रवास! चैत्रोत्सवाच्‍या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळातर्फे बसफेऱ्या

Nashik News : चैत्रोत्‍सवाच्‍या पार्श्वभूमीवर प्रायोगिक तत्त्वावर बारा फेऱ्या या मार्गावर उपलब्‍ध असतील.
Saptashrungi Gad & Electric Bus
Saptashrungi Gad & Electric Busesakal
Updated on

नाशिक : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्‍या सप्तशृंगीदेवीच्‍या दर्शनाला जाताना आता भाविक पर्यावरण संवर्धनासदेखील हातभार लावणार आहेत. महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळातर्फे नाशिक ते सप्तशृंगगड या मार्गावर ई-बस चालविल्‍या जाणार आहेत. चैत्रोत्‍सवाच्‍या पार्श्वभूमीवर प्रायोगिक तत्त्वावर बारा फेऱ्या या मार्गावर उपलब्‍ध असतील. (Nashik Saptshringi garh travel by electric bus tours by MSRTC news)

इंधनाच्‍या एसडी बसगाड्यांमुळे होणारे वायुप्रदूषण रोखण्यासाठी एसटी महामंडळातर्फे इलेक्‍ट्रिकल बस ताफ्यात दाखल केल्‍या जात आहेत. यापूर्वी नाशिक-पुणे मार्गावर या बसगाड्या उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत. आता नाशिक-सप्तशृंगगड या मार्गावरदेखील प्रायोगिक तत्त्वावर या बसगाड्या सोडल्‍या जात आहेत.

एसटी महामंडळाने जारी केलेल्‍या माहितीनुसार या बसगाड्या पर्यावरणपूरक आहेत. या बससेवेत पाच ते दहा वर्षांच्‍या मुलांना अर्ध्या तिकिटाची सवलत लागू राहणार आहे. तसेच महिला, अमृत ज्‍येष्ठ नागरिक, इतर शासकीय योजनांचे लाभार्थी यांना बससेवेतील सवलत अनुज्ञेय राहील.  (latest marathi news)

Saptashrungi Gad & Electric Bus
Nashik Rang Panchami : कामातून मुक्त होत अधिकारी-कर्मचारी थिरकले! पोलिस आयुक्तालयात रंगपंचमी उत्साहात

आजपासून सेवेला प्रारंभ

चैत्र पौर्णिमेनिमित्त सोमवार (ता. १)पासून या बससेवेला प्रारंभ होणार आहे. सध्याच्‍या वेळापत्रकानुसार सकाळी पाचपासून सायंकाळी साडेसह या वेळेदरम्‍यान जुने सीबीएस बसस्‍थानक येथून या बस सोडल्‍या जातील. यामध्ये नाशिक ते सप्तशृंगगड सहा फेऱ्या आणि सप्तशृंगगडापासून नाशिकपर्यंतच्‍या सहा, अशा एकूण बारा फेऱ्यांचे नियोजन असणार आहे.

Saptashrungi Gad & Electric Bus
Nashik Police: ‘नेत्यां’च्या संपर्कातील गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर! आयुक्तालयाकडून पोलिस ठाणेनिहाय संबंधितांची यादी तयार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.