Satana MSRTC Depot : जुन्याच बसेसमधून रामभरोसे प्रवास! नव्या गाड्यांची प्रतिक्षा; परिसरात खड्डे अन्‌ घाणीचे साम्राज्य

Latest Nashik News : आज आगारात सुविधा असूनही केवळ त्याकडे दुर्लक्ष न दिल्याने समस्या वाढल्या आहे. तर आगाराला नवीन बसेस नसल्याने जुन्याच बसेसमधून रामभरोसे प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
Two wheelers installed at entrance of Satana bus stand & concreting work in slow progress at bus stand
Two wheelers installed at entrance of Satana bus stand & concreting work in slow progress at bus standesakal
Updated on

सटाणा : कसमादे पट्ट्यातील महत्त्वाचे बसस्थानक म्हणून सटाणा बसस्थानकाकडे पाहिले जाते. ३८ वर्षापूर्वी तालुक्याला बस आगार मंजूर झाले होते. तेव्हा सटाणा आगार प्रवासीभिमुख सोयी सवलती व दर्जेदार सेवेबरोबरच स्वच्छता केंद्रित आगार म्हणून राज्यभर ओळखले गेले होते.

मात्र, आज आगारात सुविधा असूनही केवळ त्याकडे दुर्लक्ष न दिल्याने समस्या वाढल्या आहे. तर आगाराला नवीन बसेस नसल्याने जुन्याच बसेसमधून रामभरोसे प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. (Satana MSRTC Depot old buses travel)

१९८६ मध्ये सटाण्याला नवे बसस्थानक व्हावे यासाठी तत्कालीन एस काँग्रेसचे बागलाण तालुका अध्यक्ष विजयराज वाघ यांनी चार-पाच वेळा रास्ता रोको व बेमुदत उपोषण करीत आंदोलन छेडले होते. त्यानंतर महामंडळाचे अध्यक्ष पी.के. अण्णा पाटील यांनी दोन कोटी रुपये खर्चाच्या सटाणा आगाराचे भूमिपूजन केले होते.

मात्र, आजच्या घडीला बसस्थानकात प्रवाशांसाठी अनेक सुविधा आगाराकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. परंतु, त्याची दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने आज स्वच्छतागृहाची बाहेरील अवस्था अतिशय खराब झाली असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. स्वच्छतागृहामागील भागात सोडण्यात आलेले सांडपाणी, उघडे सेफ्टी टॅंक आणि उगवलेल्या काटेरी झुडपांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डास मच्छरांचे प्रमाणही वाढले आहे.

त्यामुळे प्रवाशांसह परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. गर्दीच्या काळात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट असता. टवाळखोर देखील बसस्थानक परिसरात असतात. तक्रार केल्यानंतर पोलिस कारवाई होते. मात्र, पुन्हा काही दिवसांनी जैसे थे परिस्थिती होते. तसेच बसस्थानक परिसरात अवैधरीत्या खासगी वाहने लावली जात असल्याने त्याचा देखील त्रास बसचालकांना सहन करावा लागतो.

७२ बसेसमधून प्रवास

वर्षानुवर्षे त्याच बसेसमधून प्रवासी वाहतूक करण्याची वेळ येथील सटाणा येथील प्रवाशांवर आली आहे. सटाणा आगारातून ७२ बसेसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जाते. मात्र या सर्व बसेस जुन्या आहे. नवीन बसेसची आगाराला प्रतिक्षा आहे. जुन्या बसेसची तपासणी करुन त्या फेऱ्या मारतात. मात्र, अनेकदा त्या प्रवासातच बंद पडत असल्याने प्रवाशांनाच धक्का देण्याची वेळ येते. कालबाह्य झालेल्या वाहनांपैकी तीन वाहने ऑगस्ट २४ मध्ये स्क्रॅप करण्यात आलेली आहेत. (latest marathi news)

Two wheelers installed at entrance of Satana bus stand & concreting work in slow progress at bus stand
Beed News : गावच्या महसूल प्रमुखपदाची ‘नोकरीही आम्हाला नको रे बाबा’; 6 महिन्यानंतरही २८ तलाठी रुजूच नाहीत

कॉंक्रिटीकरण संथगतीने

बसस्थानकात औद्योगिक क्षेत्राकडून काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, हे काम अतिशय संथगतीने सुरु असल्याने याचा नाहक त्रास प्रवासी, बसचालक यांना सहन करावा लागत आहे. यातच बसस्थानक आवारात सर्वत्र खड्डे साम्राज्य झाल्याने गाड्याची दुरुस्तीचे कामदेखील वाढत आहे.

एकूण प्रवासी बसेस : ७०

मालवाहतुकीसाठी महाकार्गो : ५

एकूण फेऱ्या : ४६६

चालक : १५३

वाहक : १३३

यांत्रिक : ५५

प्रशासकीय : ३८

सफाई कर्मचारी : ५

सफाई कामगार १ + ३ कंत्राटी : ४

"विविध सवलतींच्या जोरावर एसटी महामंडळ पुन्हा आपल्या मूळ स्थितीत येत आहे. सटाणा आगाराने जुलै २०२४ मध्ये ३४.९२ लाख रुपयाचा नफा कमविलेला आहे. प्रवासीपूरक सोईसवलती बस स्थानकावर उपलब्ध करून दिल्या आहे. लवकरच आगाराला डिझेल व इलेक्ट्रीक बसेस उपलब्ध होणार आहे."- राजेंद्र अहिरे, आगार व्यवस्थापक सटाणा आगार

"सटाणा आगाराला गेल्या अनेक वर्षांपासून नवीन बसेसचा पुरवठा झालेला नाही. नवीन बसेस सटाणा आगाराला दिल्यास उत्पन्न वाढेल."- निलेश सोनवणे, प्रवासी

"सटाणा आगारातून प्रवासीभिमुख सोयी सवलती दिल्या जात असल्या तरी सटाणा आगारातील बसेस या वर्षानुवर्षे त्याच असल्यामुळे प्रवाशांना प्रवासामध्ये अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे सटाणा आज किमान ४० नवीन बसेस दिल्यास आधार कार्यक्षेत्रातील जनसामान्यांना विविध गावांना सुखकर प्रवास करता येईल." - राजेंद्र देवरे, सामाजिक कार्यकर्ते

Two wheelers installed at entrance of Satana bus stand & concreting work in slow progress at bus stand
Semi High Speed ​​Railway : पुणे- सेमी हायस्पीडसाठी मार्ग बदलावा लागणार : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.