Nashik News : सटाणा रिंगरोडला अतिक्रमणांमुळे ‘ब्रेक’! काम ठप्प झाल्याने नागरीकांची कोंडी

Nashik News : सटाणा शहरातून जाणारी वाहतूक विभागली जाणार असल्याने या रिंग रोडच्या संकल्पनेस नगरविकास खात्याने मंजुरी देऊन निधीही उपलब्ध करून दिला.
It is the encroached wall compound that is obstructing the work of Satana Ring Road.
It is the encroached wall compound that is obstructing the work of Satana Ring Road.esakal
Updated on

सटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गाला वळण रस्त्याचा (बायपास) प्रश्‍न पडला असताना माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी मोठ्या कल्पकतेने येथील भाक्षी रोडवरून थेट मालेगाव रस्त्याकडे जाणाऱ्या रिंग रोडचे बांधकाम मंजूर करून रस्ता बांधकाम सुरु केले. (Satana Ring road break due to encroachment)

शहरातून जाणारी वाहतूक विभागली जाणार असल्याने या रिंग रोडच्या संकल्पनेस नगरविकास खात्याने मंजुरी देऊन निधीही उपलब्ध करून दिला. पाच किलोमीटर अंतराचा हा रिंग रोड शहरवासीयांसाठी पहिला व पर्यावरणपूरक जॉगिंग ट्रॅक म्हणून ही वापरण्याचा उद्देश यामागे होता. मात्र, या रिंग रोडच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण व खासगी प्लॉटधारकांनी मनाला येईल तसे बांधलेले तार कंपाउंड यामुळे रिंग रोडचे काम एक किलोमीटरवर ठप्प झाले आहे.

भाक्षी रोडवरील मंजुळे पेट्रोल पंपाच्या बाजूने या रिंग रोडची सुरुवात होते. तेथूनच दुभाजक टाकून रस्ता काँक्रिटीकरण व ट्रॅकचे काम स्ट्रीट लाईटसह झटक्यात झाले. मात्र, ८०० ते ९०० मीटर अंतरावर ते या अडथळ्यांच्या शर्यतीत अडकले आहे. पूर्वीपासूनच रिंग रोड जात आहे तेथे खासगी मालकीच्या शेतजमिनी होत्या. बिनशेती झाल्याचे भासवत काही शेतमालकांनी प्लॉट पाडून स्वतंत्र भूखंड गुंठेवारीनुसार विक्री सुरू केली.

त्यांचे टाऊन प्लॅनिंगनुसार ले-आउट झालेले नाहीत. तरीही हे शेत जमिन मालक व काही प्लॉट घेणारे भूखंड मालकांनी (प्लॉट धारकांनी) लोखंडी जाळीचे कुंपण घालून रिंग रोडच्या कामात अडथळा आणला आहे. हा मार्गच त्यांना मान्य नसल्याने काम बंद पाडले आहे. सर्व्हे नंबर ७१ पैकी काही भागाची मोठी अडचण असून, या ठिकाणी रस्ताकाम बंद झाले आहे. पालिका प्रशासन याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. (latest marathi news)

It is the encroached wall compound that is obstructing the work of Satana Ring Road.
Nashik Police : ‘रॅश-ड्रायव्हिंग’, ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ विरोधात कारवाईचा बडगा! शहर वाहतूक शाखेकडून धडक कारवाई होणार

खासगी अतिक्रमणे काढण्यास पालिका प्रशासन व अतिक्रमण विभाग पुढे धजावत नाही. म्हणूनच सर्व्हे नंबर ७१ पासून नामपूर रोडपर्यंत रस्त्याचे बांधकाम बंद आहे. नामपूर रोड ओलांडून रिंग रोडचे काम पुढे चालू झाले. मात्र, पुढेही सर्व्हे नंबर १३३ मधील भूखंड एका खासगी मालकाचा असल्याने पुढे पुन्हा रिंग रोडचे काम बंद पडले.

अशाप्रकारे मंजूर असलेले रिंग रोडचे काम गेल्या दोन वर्षांपासून ठप्प आहे. पालिकेवर प्रशासक बसण्यापूर्वी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रिंग रोडला दिवंगत स्मिता प्रताप दिघावकर यांचे नाव देण्यात आले. रिंग रोड पूर्ण करावयाचा झाल्यास खासगी भूखंड धारकांस विश्‍वासात घेतल्याशिवाय या रस्त्याचे बांधकाम मालेगाव रोडपर्यंत होऊ शकणार नाही.

लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा

रिंग रोडच्या दोन्ही बाजूस रहिवासी प्लॉट्स असून या ठिकाणी बंगल्यांचे बांधकामही झाले आहे. या रिंग रोडचा वापर फक्त तेथील रहिवाशांच्या वाहनांसाठीच होत आहे. मात्र, अवजड वाहने जाऊ शकत नाहीत. रस्ता मोकळा असल्याने सकाळी व संध्याकाळी नागरिक व महिलांची फिरण्यासाठी चांगली सोय झाली आहे.

It is the encroached wall compound that is obstructing the work of Satana Ring Road.
Nashik Crime News : विळ्याच्या साहाय्याने वृद्धेचा खून! गुलमोहर नगर परिसरातील घटना

मारवाडी हाउसिंग सोसायटीपर्यंत रिंग रोडचे बंद पडलेले काम लवकरात लवकर सुरू करावे म्हणजे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होईल, अशी नागरिकांची मागणी आहे. नगर पालिका प्रशासनाने संबंधित भूखंड मालकांना विश्‍वासात घ्यावे व रस्ता बांधकाम सुरू करावे, यासाठी लोकप्रतिनिधींनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे.

झालेल्या खर्चाचे काय?

आजपर्यंत झाले तेवढ्या रिंग रोडचे डांबरीकरण झाले आहे. रिंग रोडच्या दोन्ही बाजूस पादचारी मार्गावर प्लेवर ब्लॉकही टाकण्यात आले आहेत. पंधराशे मीटरच्या रस्ता बांधकामास आतापर्यंत अंदाजे ९० लाख रुपये खर्च करण्यात आला असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, रिंग रोड पूर्ण झाला नाही तर या रिंग रोडला अर्थच उरणार नाही. मग, झालेल्या खर्चाचे काय, असा प्रश्‍न शहरवासीयांना सतावत आहे.

It is the encroached wall compound that is obstructing the work of Satana Ring Road.
Nashik Dada Bhuse : जिल्हा बॅंक सक्तीच्या वसुलीविरोधात लवकरच बैठक : भुसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.