Maharashtra Ranji Team: रणजीसाठी महाराष्ट्र संघात सत्‍यजित, मुर्तुझा, रामकृष्ण! नाशिकच्‍या तिघा क्रिकेटपटूंना संघात स्‍थान

Latest Sports News : राज्‍याच्‍या संघात नाशिकच्‍या सत्यजित बच्छाव, मुर्तुझा ट्रंकवाला यांना स्‍थान मिळाले आहे, तसेच मुळचा नाशिककर असलेला रामकृष्ण घोष याचीही संघात निवड झाली आहे.
Satyajit Bachchav, Murtuza Trunkwala & Ramakrishna Ghosh
Satyajit Bachchav, Murtuza Trunkwala & Ramakrishna Ghoshesakal
Updated on

नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ने २०२४-२५ हंगामासाठी महाराष्ट्र संघाची घोषणा केली आहे. राज्‍याच्‍या संघात नाशिकच्‍या सत्यजित बच्छाव, मुर्तुझा ट्रंकवाला यांना स्‍थान मिळाले आहे, तसेच मुळचा नाशिककर असलेला रामकृष्ण घोष याचीही संघात निवड झाली आहे. (Satyajit, Murtuza Ramakrishna in Maharashtra Ranji team)

डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव व सलामीचा फलंदाज मुर्तुझा ट्रंकवाला अनुभवी रणजीपटू आहेत. रामकृष्णने मागील हंगामात रणजित पदार्पण केले. सत्यजितने महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही पार पाडली आहे. सत्यजित यंदाच्या महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक बळी घेत उत्कृष्ट गोलंदाज सन्मान ‘पर्पल कॅप’चा मानकरी ठरला होता. त्‍याने एकूण २५ बळी टिपले होते.

मुर्तुझा सलामीचा फलंदाज असून, महाराष्ट्र संघातर्फे बीसीसीआयच्या रणजी चषक स्पर्धेत २०२३-२४ च्या हंगामात त्याचे दमदार पुनरागमन झाले होते. संधी मिळताच विदर्भ विरुद्ध दुसऱ्या डावात मुर्तुझाने १२६ चेंडूत १५ चौकारांसह ८६ धावा केल्या होत्‍या. २०१७ ला मुर्तुझाचा महाराष्ट्र रणजी संघामध्ये पहिल्यांदा समावेश झाला होता. (latest marathi news)

Satyajit Bachchav, Murtuza Trunkwala & Ramakrishna Ghosh
8 sixes, 9 fours : लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजाचे ट्वेंटी-२०त शतक, KL Rahul च्या कॅप्टन्सीला धोका

त्यावेळी पहिल्याच रणजी सामन्यामध्ये मुर्तुझाने शतक झळकविले होते. सत्यजित, मुर्तुझा व रामकृष्ण घोष यांच्या निवडीबद्दल जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्‍छा दिल्‍या.

Satyajit Bachchav, Murtuza Trunkwala & Ramakrishna Ghosh
IND vs BAN 2nd Test : ना मुन्ना, ना...! Jasprit Bumrah चा इन स्वींग सोडण्याची चूक अन् दांड्या गुल Video

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.