आदित्य ठाकरेंचा वाहून गेलेला 'तो' पूल मुख्यमंत्री शिंदेंनी पुन्हा उभारला

तात्कालीन सरकारचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी सदर ठिकाणी पाहणी करत तीन दिवसांतच लोखंडी पूल बांधला होता.
Sakal
SakalNews
Updated on

नाशिक : नाशिकमधील तास नदीवरील शेंद्रीपाडा- खारशेत- सावरपाडा येथील नागरिकांची पाण्यासाठीची होत असलेली वणवणीची बातमी सकाळने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली होती. या पाड्यावरील लोक नदीच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर जाण्यासाठी लाकडाचा वापर करत होते. त्यानंतर तात्कालीन सरकारचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी सदर ठिकाणची पाहणी करत तीन दिवसांतच लोखंडी पूल बांधून तेथील लोकांना नदी ओलांडण्यासाठी सोय उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर यंदाच्या पावसाच्या पहिल्याच पुरात हा पूल वाहून गेला असून मुख्यमंत्री शिंदे सरकारने दखल घेत हा पूल नव्याने बांधला आहे.

शेंद्रीपाडा येथील लोखंडी पूल वाहून गेल्याने ठाकरे सरकारवर लोकांनी निशाणा साधला होता. त्यानंतर ही बातमी सकाळने प्रसिद्ध केल्यावर शिंदे सरकारने दखल घेत नाशिक जिल्हा प्रशासनाला पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर शिंदे यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेळ चिवटे यांनी सदर ठिकाणची पाहणी केली होती. त्यानंतर आता त्या ठिकाणी दुसरा लोखंडी पूल उभारण्यात आला आहे.

Sakal
शिवाजी महाराजांची मूर्ती असलेल्या गाड्यांना बालाजीला प्रवेश 'नाही'च; पाहा व्हिडिओ

काय आहे प्रकरण ?

नाशिक जिल्ह्यातील सावरपाडा येथील आदिवासी लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. दुरून पाणी आणताना नदीच्या एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी लाकडी बल्लीचा वापर केला जात होता. ही बातमी सकाळने प्रसिद्ध करत आदिवासींची वणवण दाखवली होती. त्यानंतर तात्कालीन ठाकरे सरकारने याची दखल घेत या नदीवर पूल बांधून दिला होता. पण हा पूल पहिल्याच पावसाच्या पूराच वाहून गेल्यामुळे आताच्या शिंदे सरकारने कार्यवाही करत हा पूल नव्याने उभारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.