फोन करून देणार लशीचा दुसरा डोस

वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रणासाठी उपाय
second dose of corona vaccine
second dose of corona vaccinesakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दर आठवड्याला दुपटीने वाढत आहे. राज्यात नाशिकचा पॉझिटिव्हीटी दरही सर्वाधिक म्हणजे ४० टक्के इतका आहे. सात लाखाहून अधीक नागरिकांनी दुसऱ्या डोसकडे पाठ फिरविली आहे. या चिंताजनक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रशासनाने दुसरा डोस न घेतलेल्यांना फोन करुन दुसरा डोस देण्याचे नियोजन सुरु केले आहे.(second dose of corona vaccine)

second dose of corona vaccine
उत्तर भारतात तेव्हा सेनेची लाट होती, आमचा पंतप्रधान झाला असता - संजय राऊत

जिल्ह्यात बाधित रूग्णसंख्या वाढीची स्थिती चिंताजनक आहे. १३ जानेवारीला जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ७ हजार ८०० होती. आठवडाभरात ती दुपटीने वाढून आज सक्रीय रूग्णांची संख्या १५ हजार ९००पर्यंत पोचली. सलग ४ आठवड्यांपासून दर आठवड्याला रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. ही चिंताजनक परिस्थिती आहे. सक्रिय रूग्णांपैकी ८०५ रूग्ण हे रूग्णालयात उपचार घेत आहेत. यातील १२९ रूग्ण ऑक्सिजनवर आहेत, तर २० रूग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्ही दरही ४० टक्के आहे. दोन दिवसांपूर्वी तो ४५ टक्क्यांवर गेला होता. ओमिक्रॉनचा धोका वाटत नसला तरी, संकट अजून टळलेले नाही. त्यामुळे लसीकरण आणि टेस्टिंग वाढविण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे.

second dose of corona vaccine
भाजपसोबत जे पक्ष गेले, ते संपले - नवाब मलिक

दहा टक्के बालकं बाधित

मागील काही दिवसांत बाधित २४ हजार ४८२ पैकी २ हजार ६१९ म्हणजेच जवळपास १० टक्के बालकांना कोरोना संसर्ग झाल्याचे दिसून आले. हे प्रमाण कमी असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, शाळांमध्ये संसर्ग आढळून आल्यास त्या तालुक्यातील किंवा शहरातील शाळा बंद करण्याचेही नियोजन आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन स्थितीत शाळा बंद करण्यासाठी तालुकास्तरावरील आधिकाऱ्यांना निर्णयाचे आधिकार दिले आहेत.

second dose of corona vaccine
भाजपसोबत जे पक्ष गेले, ते संपले - नवाब मलिक

लसीकरणाचा वेग वाढविण्याचा निर्णय

जिल्ह्यातील ७ ते ८ लाख नागरिकांनी अद्याप लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी दुसरा डोस घ्यावा यावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाने लक्ष केंद्रीत केले आहे. दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांना फोन करुन डोस देण्याचे नियोजन शनिवारी झालेल्या बैठकीपासून सुरु झाले. गावोगावच्या अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविकांसह यंत्रणेमार्फत, दुसऱ्या डोससाठी आवश्यक असलेल्या ८४ दिवसांचा कालावधी पूर्ण होउनही डोसकडे पाठ फिरविलेल्या नागरिकांना फोन करुन बोलावून घेत दुसरा डोस देऊन लसीकरणाचा वेग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.